कॅन्सरशी दोन हात केलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या आजारपणानंतर पतीमध्ये जाणवला हा बदल; इन्स्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट
सोनाली आणि गोल्डी यांच्या लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सोनालीने पतीसोबतचे फोटोज शेअर केले आहेत. सोनालीने म्हटलं की, गेल्या वर्षी यादिवशी आम्ही न्यूयॉर्कच्या रुग्णालयात होतो. जेव्हा मला कॅन्सर झाल्याचं समजलं तेव्हा बेंद्रे आणि बहेल या दोन्ही कुटुंबामध्ये बदल झाले.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ही नुकतीच कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करुन आपल्या मायदेशी परतल्यानंतर तिच्यात अनेक बदल पाहायला मिळाले. पण या आजारात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या तिच्या पतीमधील बदल हा खरंच स्तुत्यप्रिय असल्याचे सोनाली बेंद्रे ने सांगितले आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोनालीने पती गोल्डी बहल (Goldie Behl)याच्याविषयी भावनिक पोस्ट केली. आपल्याला झालेले कॅन्सरचे निदान आणि त्यात कुटूंबियांची मिळालेली साथ याबाबत तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे.
सोनाली आणि गोल्डी यांच्या लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सोनालीने पतीसोबतचे फोटोज शेअर केले आहेत. सोनालीने म्हटलं की, गेल्या वर्षी यादिवशी आम्ही न्यूयॉर्कच्या रुग्णालयात होतो. जेव्हा मला कॅन्सर झाल्याचं समजलं तेव्हा बेंद्रे आणि बहेल या दोन्ही कुटुंबामध्ये बदल झाले.
या पोस्टमध्ये तिने सांगितले आहे की, "गोल्डीसोबत लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक ट्रिप काढायचा प्लॅन झाला. मला कॅन्सर होण्यापूर्वी जर मी त्याला ट्रिपसाठी चल म्हटलं असतं तर तो तयार झाला नसता पण आता तो बदलला आहे. तो ट्रिपसाठी तयार झाला आणि त्याच्यात झालेला बदल चांगला आहे. मला तो बदल आवडला. मी आजारी असताना त्यानं सर्वकाही बाजूला ठेवून मला प्राधान्य दिलं. आता त्याला प्राधान्य द्यायची वेळ आहे" असंही सोनाली म्हणाली.
हेदेखील वाचा- Cancer वर मात केल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचे फोटो शूट पाहिले का? पाहा फोटो
गोल्डीला लग्नाच्या शुभेच्छा देताना सोनाली म्हणाली की, तू कल्पनाही करणार नाहीस एवढं तुझ्यावर माझं प्रेम आहे. मला आधार दिलास आणि माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिलास त्याबद्दल खूप आभार, गोल्डी तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हटलं.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात सोनालीने हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सोनालीने अमेरिकेत उपचार घेतले आणि नववर्षाच्या सुरुवातील भारतात परतली.
(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2019 04:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

