Sonakshi Sinha चे Salman Khan सोबत झाले लग्न? सोशल मीडिया व्हायरल झालेल्या फोटोवर भडकली अभिनेत्री
Sonakshi And Salman Khan Fake Image Viral (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड मधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा  (Sonakshi Sinhaआणि सलमान खान (Salman Khan) या दोघांनी दबंग सिनेमात एकत्रित काम केल्याचे दिसून आले आहे. या जोडीला प्रेक्षकांकडून पसंदी मिळाली होती. मात्र आता सोशल मीडियात सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांचा एक फोटो चांगलाच सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये या दोघांनी सीक्रेटपणे लग्न केल्याचे दिसून येत आहे. परंतु जेव्हा हा फोटो सोनाक्षीने पाहिला असता ती चांगलीच तापली आहे. त्यावर सोनाक्षीने म्हटले की, हा फोटो फेक असून यावर विश्वास ठेवणारे मुर्ख आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोत असे दिसून येत आहे की, सोनाक्षीच्या हातात सलमान अंगठी घालताना दिसून येत आहे. फोटोत सलमानने सफेद सूट तर सोनाक्षीने लाल रंगाची साडी आणि हिरवी ज्वेलरी घातल्याने दिसत आहे. परंतु पाहताच क्षणी हा फोटो एडिटेड म्हणजेच फेक फोटो असल्याचे कळते. रेडिटच्या या पोस्टर सोनाक्षीने स्वत: कमेंट केली आहे.(Kabhi Eid Kabhi Diwali: सलमान खानचा 'कभी ईद कभी दिवाळी' हा चित्रपट यावर्षी त्याच्या वाढदिवसाच्या आठवड्यात होणार प्रदर्शित)

सोनाक्षी आणि सलमान यांचा हा फोटो पाहून युजर्स सुद्धा आता कमेंट्स करु लागले आहेत. काहींनी म्हटले की, काय हा मुर्खपणा आहे तर दुसऱ्याने हा फोटो रेस 3 सीजी लेव्ह असून अन्यजण खरंत त्यांच लग्न झाल्याचे मानत आहेत.