Singham 3 Ajay Devgn Injured: 'सिंघम 3'च्या सेटवर अजय देवगनला दुखापत; सिनेमाचं शूटिंगही थांबलं

अजयच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. डोळ्याला दुखापत झाल्याने त्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला. अभिनेत्याला दुखापत झाल्याने 'सिंघम 3'चं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

Singham (PC -Twitter/ @Ajaydevgn95)

अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) अभिनीत 'सिंघम 3' (Singham 3) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) रोहित शेट्टी (Rohit Shetty) या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. अशातच आता 'सिंघम 3'च्या सेटवर अपघात झाला आहे. अजय देवगनला दुखापत झाली आहे. त्यामुळे सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. हैदराबादमध्ये (Hydrabad) रामोजी फिल्म सिटीमध्ये या चित्रपटाची शुटींग सुरु असून यावेळी अजय देवगणला दुखापत झाली आहे. अजयच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. डोळ्याला दुखापत झाल्याने त्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला. अभिनेत्याला दुखापत झाल्याने 'सिंघम 3'चं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.  (हेही वाचा - Singham 3: सिंघम 3'मधील "या' अभिनेत्रीचा धमाकेदार फर्स्ट लूक आऊट, पाहा फोटो)

पाहा पोस्ट -

अजय देवगन सध्या 'सिंघम 3' या सिनेमामुळे चर्चेत आहे. अजयसह या सिनेमात टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत. अजयचा धमाकेदार अंदाज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अशातच आता 'सिंघम 3'च्या सेटवर अपघात झाला आहे. याआधी प्रदर्शित झालेला सिंघम आणि सिंघम रिटर्न्स हे सिनेमे प्रदर्शित झाले असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. 'सिंघम 3' या सिनेमात अजय बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement