RSS सरसंघचालक मोहन भागवत यांना दहशतवादी तर योगी आदित्यनाथ यांना बलात्कारी म्हणत गायिका हार्ड कौर हिने केली खळबळजनक पोस्ट
यावरून तिला फॅन्सच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
बॉलिवूड मधून काही काळापासून गायब असलेली प्रसिद्ध गायिका व रॅपर हार्ड कौर (Hard Kaur) हिचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे, पण यावेळेस कारण मात्र जरा वेगळंच आहे. आपल्या बोल्ड लुक व विधानांसाठी ख्यात असलेलय हार्ड कौर हिने यावेळेस आरएसएस (RSS Chief) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) व उत्तर प्रदेशाचे (UP CM) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर निशाणा साधला आहे. 17 जून ला तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट करत या दोघांवर आक्षेपार्ह्य विधान केले आहे. यामध्ये तिने देशात झालेल्या आतंकवादी हल्ल्यांसाठी आरएसएसला जबाबदार धरून भागवत यांना दहशतवादी म्हंटले आहे तर एका दुसऱ्या पोस्ट मधून तिने योगी आदित्य नाथ यांना भगव्या कपड्यातील बलात्कारी पुरुष म्हंटले आहे.
हार्ड कौर इंस्टाग्राम पोस्ट
हार्ड कौर ही केवळ भागवत व योगजनवरच टिपण्या करून थांबली नाही तर पुढील एका पोस्ट मधून तिने करकरेंना कोणी मारलं असा सवाल केलेला ही पाहायला मिळतोय. या पोस्ट खाली वापरलेल्या हॅशटॅग मधून तिने आपल्याच प्रश्नाला उत्तर देत या साठी देखील आरएसएसच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पुढील एका पोस्ट मधून हार्ड कौर हिने पत्रकार गौरी लँकेशा हिच्या हत्येवर भाष्य करत भारतीयांनो स्टॅन्ड घ्या असे आवाहन केले आहे. याबाबत तिच्या काही चाहत्यांनी तिचे कौतुक केले तर अनेकांनी कमेंट करून आक्षेप घेतला होता मात्र त्यांना देखील हार्ड कौर ने शिव्यांच्या भाषेत उत्तरं दिली आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म क्षुद्र शेतकरी घरात झाला होता, बिग बॉस फेम पायल रोहतगीचे वादग्रस्त विधान
हार्ड कौर हि आपल्या अशा प्रकारच्या विधानांसाठी नेहमीच ओळखली जायची. या आधी देखील तिने पूर्व पॉर्नस्टार सनी लिओनी वर कमेंट करून स्वतःला वादाच्या भोवऱ्यात अडकवून घेतले होते. मात्र यावेळेस तर तिने देशातील प्रतिष्ठ नावांवर अपमानास्पद टीका करत पंगा घेण्याचा धाडस दाखवले आहे.