Lockdown: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याच्या एका डोळ्याला नक्की काय झाले? फोटो पाहून चाहते चिंतेत
सध्या लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सुद्धा सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करत आहे.
संपूर्ण देशात लॉकडाउन असल्यामुळे अनेक अभिनेते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सुद्धा सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करत आहे. नुकताच श्रेयस याने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओत श्रेयस त्याच्या एका डोळ्याला बॅन्डेड केल्यासारखी पट्टी दिसत आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एवढेच नव्हेतर श्रेयसने या फोटोला जे कॅप्शन दिले आहे, हे पाहून चाहते अधिकच घाबरले आहेत.
श्रेयस तळपदेने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या एका डोळ्याला पट्टी दिसत आहे. यामुळे त्याचे चाहत्यांमध्ये चिंता दिसू लागली आहे. एवढेच नव्हेतर, हा फोटो शेअर करताना श्रेयसने लिहिले आहे की, क्वारंटाईनचे इफेक्ट. मी चुकीच्या जागेवर मास्क लावलेला नाही. तुम्ही सांगू शकता का हे काय झाले असेल. श्रेयसच्या या फोटोवर त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहे. श्रेयसला काही दुखापत तर झाली नाही ना असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. या फोटोवर चाहत्यांच्या अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. हे देखील वाचा- मुंबई: 'खान माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक'; प्रसिद्ध कलाकार रणजित दहिया यांनी आपल्या घराच्या भितींवर रेखाटले अभिनेता इरफान खान यांचे छायाचित्र
इन्स्टाग्राम पोस्ट-
अभिनेता Aamir Khan ने पीठाच्या पाकीटात टाकून वाटले १५ हजार रूपये ? काय आहे खरी बातमी - Watch Video
श्रेयसने मराठी मालिकांमधून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. श्रेयसची दामिनी ही मालिका प्रचंड गाजली आणि त्याला यश मिळतच गेले. त्याने मराठी चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही काम केले आहे. बॉलिवूडमध्ये इकबाल या चित्रपटाने श्रेयसला स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली. त्याच्या भूमिकेच खूप कौतुकही झाले होते.