Shravan Rathod यांच्या मुलाचा खुलासा, कोविड 19 पॉझिटिव्ह होण्यापूर्वी आई कुंभमेळ्यात गेल्याची दिली माहिती
श्रवण यांचे चिरंजीव संजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे आई वडील कुंभमेळ्यातून परतलेल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचं समजलं होतं
बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड(Shravan Rathod) यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. कोरोना बाधित असल्याने दिवसागणिक त्यांची प्रकृती ढासळत होती. 66 वर्षीय श्रवण राठोर यांचे काल उपचारादरम्यान हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. मीडीया मध्ये आलेल्या ताज्या रिपोर्ट्सनुसार, श्रवण आणि त्यांची पत्नी कोरोना पॉझिटीव्ह होण्यापूर्वी कुंभमेळ्यात गेले होते. तेथून परतल्या नंतर त्यांना त्रास होण्यास सुरूवात झाली. Music Composer Shravan Rathod Passed Away: संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन, काही दिवसांपूर्वी झाली होती कोरोनाची लागण.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीमध्ये श्रवण यांचे चिरंजीव संजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे आई वडील कुंभमेळ्यातून परतलेल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचं समजलं होतं. 'आम्ही विचार केला नव्हता आमचं कुटुंब इतक्या कठीण काळातुन जाईल. वडीलांचं कोरोनामुळे निधन झालं आहे तर आई, भाऊ कोरोना पॉझिटीव्ह आहे. सध्या आम्ही होम आयसोलेशन मध्ये आहोत. वडीलांच्या निधनामुळे आम्हांला अंतिम कार्यामध्ये सहभागी होता आलं आहे.'
संजीव आणि त्याची आई विमला देवी सेवेन हिल्स हॉस्पिटल मध्ये आहे. दोघेही आजारावर मात करत आहे. काही रिपोर्ट्समध्ये असे देखील सांगितलं जात होतं की हॉस्पिटल बिल्समुळे वडीलांची बॉडी दिली जात नाही. मात्र ते खोटं आहे. हॉस्पिटलने खूप सहकार्य केले आणि जे शक्य होतं ते केले आहे. संजीव यांचा भाऊ दर्शन हॉस्पिटलमध्ये आला होता आणि त्याला वडिलांच्या पार्थिवासोबत जाण्यास मिळालं. यामध्ये बीएमसी रूग्णवाहिका आणि अन्य गोष्टींमध्ये आमची मदत करत होती.