Shraddha Kapoor इन्स्टाग्रामवर जलवा; दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट ला मागे टाकत बनली तिसऱ्या क्रमांकाची प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटी

श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) सोशल प्लॅटफॉर्मवर लोकप्रियतेच्या दृष्टीने एक नवीन कामगिरी केली आहे. इन्टाग्रावर (Instagram) बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांना मागे टाकत तिने तिसर्‍या क्रमांक मिळला आहे.

Shraddha Kapoor(PC - Facebook)

श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) सोशल प्लॅटफॉर्मवर लोकप्रियतेच्या दृष्टीने एक नवीन कामगिरी केली आहे. इन्टाग्रावर (Instagram) बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांना मागे टाकत तिने तिसर्‍या क्रमांक मिळला आहे. श्रद्धाचे इंस्टाग्रामवर 5 कोटी 64 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तसेच दीपिका पादुकोणचे 52.3 दशलक्ष तर आलिया भट्टचे 50.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या दोन अभिनेत्रींना मागे टाकत श्रद्धा इंस्टाग्रामवर तिसऱ्या क्रमांकाची प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटी बनली आहे. श्रद्धाच्या पुढे क्रिकेटर विराट कोहली आणि प्रियांका चोप्रा यांचे इन्स्टाग्राम फॅन फॉलोवर्स जास्त आहेत. विराटचे इन्स्टाग्रामवर 82.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर प्रियांकाचे विराटच्या पाठोपाठ 58.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, श्रद्धा तिच्या आगामी चित्रपटात इच्छाधारी नागिनची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती श्रद्धा प्रथमचं सर्पाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती निखिल द्विवेदी करणार आहेत. तसेच नागिन चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया करणार आहेत. श्रद्धाने गेल्या आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली होती. (हेही वाचा - Mumbai Police Summons Kangana Ranaut: मुंबई पोलिसांकडून कंगना रनौत हिच्यासह बहिण रंगोली चांडेल यांना समन्स, 10 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश)

 

View this post on Instagram

 

Any trend that walks the runway, Melorra has a collection for it. Fashionable gold jewellery that goes with my wardrobe, and all that I do every day! With @melorra_com, live the #ArtOf24x7Fashion! ⚜️💜 #Melorra #EverydayFineJewellery #TrendyGold #LightweightGoldJewellery Make up & hair by the Magic girls @shraddha.naik & @menonnikita Photo by the amazing @prasadnaaik

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor) on

नागिन ची भूमिका करण्यासाठी अतिशय उत्सूक असून मला लहाणपणापासून अशी भूमिका साकारायची होती. आज प्रत्येक्षात मला ही संधी मिळाली आहे. मला श्रीदेवींचा नगीना चित्रपट अत्यंत आवडला होता. तेव्हापासून मला अशा चित्रपटात काम करण्याची इच्छा होती, असं श्रद्धाने म्हटलं होतं.

दरम्यान, 2020 मध्ये श्रद्धाचा बागी 3 चित्रपट रिलीज झाला होता. ज्यामध्ये ती टायगर श्रॉफबरोबर मुख्य भूमिका साकारताना दिसली होती. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांची कन्या श्रद्धा हिने आपल्या करिअरची सुरुवात 2010 मध्ये 'तीन पत्ती' या चित्रपटातून केली होती. ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि आर माधवन सारख्या कलाकारांनी अभिनय केला होता. श्रद्धाला 2013 मध्ये आशिकी 2 चित्रपटात मोठं यश मिळालं.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now