धक्कादायक! सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईचे सलमान खान वर गंभीर आरोप; पहा व्हिडिओ

या मृत्यूमुळे अनेक लोकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. यामुळे बॉलीवूडचे एक विदारक सत्य समोर येत आहे व एक नवीन मुद्दा जोर धरू लागला आहे तो म्हणजे...नेपोटिझम!

Sushant Singh Rajput, Jiah Khan and Rabia Khan (Photo Credits: Twitter/Facebook)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची आत्महत्या हा सर्वांसाठीच फार मोठा धक्का आहे. या मृत्यूमुळे लोकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या घटनेमुळे बॉलीवूडचे एक विदारक सत्य समोर येत आहे व एक नवीन मुद्दा जोर धरू लागला आहे तो म्हणजे...नेपोटिझम! या नेपोटिझममुळेच, बॉलीवूडमधील दुजाभावामुळेच सुशांतने आत्महत्या केली अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा आता दिवंगत अभिनेत्री जिया खान (Jiah Khan), जिने 2013 साली आत्महत्या केली होती, तिच्या आईचा राबिया खानचा (Rabia Khan) व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये राबिया यांनी सलमान खानवर (Salman Khan) गंभीर आरोप केले आहेत.

राबिया या व्हिडिओमध्ये म्हणतात, ‘सुशांतच्या मृत्यूने मला 2015 ची आठवण करून दिली, जेव्हा मी सीबीआय अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते. त्यांनी मला लंडनहून फोन करून सांगितले की, आम्हाला काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. त्यानंतर मी भारतामध्ये आले व इथे आल्यावर पोलीस मला म्हणाले, आम्हाला सलमान खानचा फोन आला होता, तो दररोज कॉल करतो आणि त्याने खूप पैसे गुंतवले असल्याचे सांगतो. तो म्हणतो की ‘मुलाला काही विचारू नका, त्याला काहीही बोलू नका’, आत तुम्हीच सांगा मॅडम, आम्ही काय करू शकतो?’

त्यानंतर राबिया यांनी हे प्रकरण दिल्लीच्या हाय सीबीआय अधिकाऱ्यांकडे नेले, व याबाबत तक्रार केली.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

Late Actress Jiah Khan's Mother From London On NEPOTISM In Bollywood Issue 💔 . . . #sushantsinghrajput #jiahkhan #suicide #nepotism #bollywoodmovies

A post shared by Scuttlebutt (@bollywood.scuttlebutt) on

पुढे त्या म्हणतात, ‘अशाप्रकारे जर का सलमान खान आपली पॉवर आणि पैशांच्या जोरावर दबाव आणत असेल, मृत्यू, तपास अशा गोष्टींशी खेळत असेल तर, मग आपण नागरिक म्हणून कोणत्या दिशेने जात आहोत हे मला ठाऊक नाही. यासाठी प्रत्येकाने स्वत: साठी उभे राहायला हवे, लढा देऊन निषेध सुरू करावा लागेल. बॉलिवूडमधील लोकांचे असले घातक वर्तन थांबवावे लागेल.' (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अनेक कलाकारांची बॉलीवूडवर सडकून टीका; समोर आले भयानक सत्य, जाणून घ्या कोण काय म्हणाले)

दरम्यान, जिया खानने 3 जून 2013 रोजी आत्महत्या केली होती व तिच्या मृत्यूचे कारण अद्याप गूढ आहे. मात्र, आत्महत्येच्या संशयाची सुईतिचा जवळचा मित्र सूरज पंचोलीवर होती व त्यानंतर सूरजला तुरूंगातही जावे लागले होते. दरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी समोर येऊन इथल्या भेदभावाबद्दल उघडपणे भाष्य केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif