TikTok साठी शिल्पा शेट्टी चा झालेला हा अवतार पाहून तुम्हीही क्षणभर व्हाल अवाक्, Watch Video

'आँखे जब खोलेगा तो पाएगा मुझे' असे म्हणत तिने आपला भयानक चेहरा आपल्या चाहत्यांना दाखविला आहे.

Shilpa Shetty (Photo Creits: Instagram)

बॉलिवूडची सेक्सी आणि ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचे पती राज कुंद्रा  (Raj Kundra) हे दोघेही सोशल मिडियावर बरेच सक्रिय दिसतात. त्यात शिल्पाने अलीकडेच टिकटॉकवर 15 मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. ही आनंदाची बातमी शिल्पाने आपल्या मुली समिशासह आपल्या चाहत्यांना दिली. आपल्या एकाहून एक सरस टिकटॉक व्हिडिओने ती आपल्या चाहत्यांना लॉकडाऊनच्या खूश ठेवत तर आहेच पण हे व्हिडिओ करत असताना ती स्वत: किती एन्जॉय करते हे आपल्याला तिच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसेल. नुकताच तिने आपला एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील तिचा अवतार पाहून तुमची झोपच उडेल.

'आँखे जब खोलेगा तो पाएगा मुझे' असे म्हणत तिने आपला भयानक चेहरा आपल्या चाहत्यांना दाखविला आहे. शिल्पा शेट्टी चा मराठमोळ्या अंदाजातील टिकटॉक व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून खळखळून हसाल, Watch Video

पाहा व्हिडिओ:

@theshilpashettyJab galat filter lag jaata hai👹👹🤪😛 ##fyp ##scary ##comedy ##filter ##laughs ##funny

♬ original sound - 👑VARUN SHARMA👑

या व्हिडिओमध्ये ती जितकी भयानक तितकीच क्युट दिसत आहे. नुकताच तिने एक नवा टिकटॉक व्हिडिओ शेअर केला होता. हा एक मराठमोळ्या गाण्यावर व्हिडिओ आहे. त्यावर राज आणि शिल्पा च्या खट्याळ गोष्टी पाहून तुम्हाला पोट धरून हसायला लावतील. शिल्पा शेट्टी या व्हिडिओमध्ये 'सूया घे पोत घे' या गाण्यावर यावर धमाल हावभाव देताना दिसत आहे.