Pathaan: किंग खानच्या ‘पठाण’ची रिलिजपूर्वीच कोटींची कमाई, ‘त्या’ गाण्याच्या माध्यमातून शाहरुख-दिपीकाने रचला नवा इतिहास
बेशरम रंग आणि झुमे जो पठाण या दोन गाण्यांचा माध्यमातून पठाण सिनेमा रिलीज होण्यापूर्वीचं पठाण सिनेमाने कोटींचा गल्ला जमावला असल्याची माहिती मिळत आहे.
खान मे खान शाहरुख खान असचं काहीसं म्हणण्याची वेळ आली आहे. गेले काही दिवसांपूर्वीचं बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या पठाण सिनेमाची घोषणा झाली. टीझर प्रदर्शित झाला आणि पहिलं गाणं बेशरम रंग बेशरम रंग गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. बेशरम रंगच्या प्रदर्शनानंतर देशभरात या गाण्याची चर्चा झाली. म्हणजे अगदी शालेय विद्यार्थ्यापासून ते सत्तीरीतल्या आजोबांना देखील बेशरम रंग हे गाणं आणि ह्या गाण्याचा वाद या चर्चेचा विशय ठरला. गाणं ऐकायला, बघायला, गाण्यातील मुव्ह्ज डान्स भारीचं. पण या गाण्यात अभिनेत्री दिपीका पदूकोणने एका शॉटमध्ये भगव्या रंगाची बिकनी घातली आहे आणि गाण्याचं नाव काय तर बेशरम रंग म्हणून हिंदू महासभेकडून या गाण्याचा निषेध नोंदवत या गाण्यातील चित्रकरण बदलवण्याची मागणी करण्यात आली.
पण झालं उलटचं, बेशरम रंग या गाण्याने युट्युवरील प्रदर्शित गाण्याचे रेकॉर्ड तोडत सर्वाधिक बघितल्या गेलेल्या गाण्यांपैकी एक ठरलं. त्याच प्रमाणे गेले दोन दिवसांपूर्वी पठाणचं झुमे जो पठाण हे गाणं प्रदर्शित झालं आणि सगळ्या बॉलिवूड फॅन्सला वेड लावल. प्रदर्शनाच्या काहीचं मिनिटांत या गाण्याने लाखो व्ह्यूज मिळवले असुन बेशरम रंग आणि झुमे जो पठाण या दोन गाण्यांचा माध्यमातून पठाण सिनेमा रिलीज होण्यापूर्वीचं पठाण सिनेमाने कोटींचा गल्ला जमावला असल्याची माहिती मिळत आहे. (हे ही वाचा:- Pathaan चित्रपटाने रिलीजपूर्वी रचला इतिहास! ICE थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा ठरला पहिला चित्रपट; ICE थिएटर म्हणजे काय? जाणून घ्या)
एवढचं नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर हा चित्रपट कुठल्या ओटीटीवर प्रदर्शित होणार याबाबत देखील चुरस बघायला मिळाली पण अखेर याबाबत चर्चा संपली असुन अमेझॉनने या चित्रपटाचे ओटीटी हक्क विकत घेतल्याची प्राशमिक माहिती आहे. पण याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती अमेझॉन किंवा पठाणच्या टीम कडून देण्यात आलेली नाही. तरी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर किंग खानच्या पठाणची जादू मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.