'Jawan' to Release in Japan: अभिनेता शाहरुख खान याचा 'जवान' होणार जपानमध्ये रिलीज; चाहत्यांकडून वेगळीच मागणी
अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोन यांचा दमदार अभिनय असलेला जवान चित्रपट आता जपानमध्ये प्रदर्शित होत आहे. दरम्यान, चाहत्यांकडून किंग खानकडे 'जवान 2' काढण्याची मागणी केली आहे.
बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अभिनित चित्रपट 'जवान' (Jawan) आता जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या 29 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट जपानमधील चित्रपटगृहांमध्ये झळकेल असे अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. किंग खान शाहरुखने या पार्श्वभूमीवर चित्रपटाचा एक ट्रेलरही शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने लिहीले आहे की, अॅक्शन आणि थरार यांच्यासाठी सज्ज व्हावा. कारण येत्या 29 नोव्हेंबरला 'जवान' जापानला निघाला आहे.
'जवान'ला दमदार प्रतिसाद, आगाऊ बुकींग सुरु
जवान चित्रपट हा एक अॅक्शन, थ्रीलर आहे. जो अॅटली यांनी सहलेखक आणि दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले आहे. पाठिमागील काही दिवसांपासून जवान जपानमध्ये प्रदर्शित करण्याची मागणी होत होती. या मागणीला प्रतिसाद म्हणून हा चित्रपट रिलीज कोला जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांचा त्याला जोरदार प्रतिसाद लाभत आहे. जपानमध्ये या चित्रपटाचे बुकींग 5 जुलैपासून सुरु झाले आहे. सांगितले जात आहे की, लोकांनी आगाऊ बुकींग सुरु केले आहे. असाही दावा केला जात आहे की, सुरुवातीची काही तिकीटे खरेदी करणाऱ्यांना शाहरुख याच्या चलेया गाण्याचे पोस्टर्सही दिले जाणार आहेत. (हेही वाचा, Jawan on Netflix: शाहरुख खानच्या जवानची नेटफ्लिक्सवरही जादू, व्हिवरशीपमध्ये पटकावले दुसरे स्थान)
'जवान 2' काढा, चाहत्यांची शाहरुख खान याच्याकडे मागणी
हा चित्रपट जपानमध्ये रिलीज होतो आहे याची माहिती मिळताच, शाहरुख खान याच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली अहे. काहींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही चाहत्यांनी हा चित्रपट तिकडे रिलीज करा. पण, भारतात या चित्रपटाचा सिक्वेल काढा अशी मागणीही केली आहे. एका चाहत्याने म्हटले आहे की, सर आता 'जवान-2' काढा. दुसऱ्या एक्स वापरकर्त्याने म्हटले आहे की, बॉक्स ऑफीसवर गल्ला जमविण्यासाठी सज्ज व्हा! आणखी एकाने म्हटले जपान ते इराण जवान सर्वांच्या हृदयात स्थान मिळवत आहे. जवानसाठी ही एक आश्चर्यकारक जर्नी असेल. कारण हा आता जागतिक पातळीवरही चांगलेच नाव कमावत आहे. प्रेक्षकांचे प्रेम मिळवत आहे. त्यामुळे चित्रपटाला पुन्हा एकदा शुभेच्छा असेही एका चाहत्याने म्हटले आहे. (हेही वाचा, DeepVeer Blessed With Baby Girl: Deepika Padukone ने दिला मुलीला जन्म; दीपिका-रणवीर झाले आईबाबा)
'एसआरके'कडून ट्रेलर रिलीज
किंग खान अभिनीत जवान जगभरातील बॉक्स ऑफिसवर ₹1,148 कोटी कमावले आणि 2023 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. रेड चिलीज एंटरटेनमेंट या बॅनरखाली आणि गौरी खान आणि गौरव वर्मा निर्मित या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलताना, एसआरके पिता आणि मुलाच्या दुहेरी भूमिकेत आहे जे भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात एकत्र येतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)