कोविड 19 रुग्णांसाठी शाहरुख-गौरी खान यांच्या चार मजली ऑफिसचे Quarantine Centre मध्ये रुपांतर; पहा व्हिडिओ
मात्र विलगीकरण कक्ष उभारलेली ही इमारत नेमकी दिसते कशी? पाहुया
कोरोना व्हायरसचे संकट देशात तीव्र होऊ लागले आहे. यावर मात करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत विविध स्तरातून होत आहे. यात बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील मोलाचे योगदान दिले आहे. अनेक सेलिब्रिटींनी पीएम केअरसह विविध संस्थांना आर्थिक मदत केली आहे. यात शाहरुख खान हे नाव महत्त्वाचे आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात केवळ आर्थिक मदत न करता त्या पलिकडे जात बॉलिवूड किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) यांनी आपल्या ऑफिसची चार मजली इमारत विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी दिली आहे. याबद्दल मुंबई महानगरपालिकेने शाहरुख-गौरीचे आभार मानले आहेत.
चार मजली इमारतीत विलगीकरण कक्ष उभारण्याचे काम पूर्ण झाले असून त्याचा व्हिडिओ गौरी खान हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मीर फाऊंडेशन (Meer Foundation) या संस्थेशी शाहरुख खानचे गेली अनेक वर्ष संबंध आहेत. त्यांचीच विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी मदत केल्याचे गौरीने पोस्टमध्ये म्हटले आहे. विलगीकरण कक्ष उभारलेली ही इमारत नेमकी दिसते कशी? पाहुया... (कोरोना व्हायरस बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी शाहरुख खान याने दिली ऑफिसची जागा; BMC ने ट्विट करत मानले आभार)
पहा व्हिडिओ:
देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यापैकी कोरोना बाधितांचा आकडा मुंबई शहरात अधिक आहे. तसंच ही संख्या सातत्याने वाढत असल्याने विलगीकरण कक्षासाठी अधिक जागेची गरज भासू शकते. त्यामुळे शाहरुख-गौरीने उचललेले हे पाऊल अत्यंत स्त्युत्य आहे.