एव्हरग्रीन अभिनेत्री 'जीनत अमान' रुपेरी पडद्यावर करणार कमबॅक, अभिनेता अर्जुन कपूर ही असणार महत्त्वपुर्ण भूमिकेत

आशुतोष गोवारिकर (Ashutosh Gowariker ) दिग्दर्शित पानीपत (Panipat) या चित्रपटातून त्या बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहेत.

Panipat Zeenat aman (Photo Credits: Instagram)

एकेकाळी रुपेरी पडदा गाजवलेली 90 च्या दशकातील चिरतरुण अभिनेत्री जीनत अमान (Zeenat Aman)पुन्हा एकदा दणक्यात रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. आशुतोष गोवारिकर (Ashutosh Gowariker ) दिग्दर्शित पानीपत (Panipat) या चित्रपटातून त्या बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहेत. या चित्रपटात अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणिु संजय दत्त (Sanjay Dutt) हे देखील महत्त्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच अर्जुन कपूर ने सोशल मिडियावर आपला एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्याची दमदार बॉडी पाहून त्याच्या चाहत्यांसोबत संपुर्ण बॉलिवूड जगत त्याची स्तुती करत आहे.

आशुतोष गोवारिकर यांचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी भव्यदिव्य सेट्स आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा मोठ्या कथानकाचा सिनेमा हे जणू समीकरणच बनलं आहे. आतापर्यंत आमीर खान, हृतिक रोशन, ऐश्वर्या राय बच्चन यांसारखे अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. त्या यादीत आता एव्हरग्रीन अभिनेत्री जीनत अमान यांच नाव जोडलं जाणार आहे.

जीनत अमान गेल्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर होती. मात्र आता पानीपत या चित्रपटातून त्या कमबॅक करणार आहे. यात ती सकीना बेगम च्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी या भूमिकेविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, सकीना होशियारगंज प्रांताचा सर्व कारभार सांभाळत होती. जेव्हा पेशवा त्यांची मदत घेण्यासाठी गेले तेव्हा तिने पानीपतच्या लढाईत एक महत्त्वपुर्ण भूमिका बजावली.

हेही वाचाआशा भोसले यांनी दिग्दर्शित केला अविनाश गोवारीकर यांच्या 'पानिपत' सिनेमातील एक सीन

या चित्रपटासाठी अर्जून कपूरने ही खूप मेहनत घेतली आहे. त्याने शेअर केलेल्या त्याच्या फोटोवरुनच त्याने आपल्या शरीरावर घेतलेली मेहनत दिसून येतेय. हा चित्रपट येत्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होईल.