Satish Kaushik Dies: अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

जाने भी दो यारों, उडता पंजाब, मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. तेरे नाम आणि मुझे कुछ कहना है या चित्रपटांचेही त्यांनी दिग्दर्शन केले.

Satish Kaushik | Instagram

बॉलीवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश चंद्र कौशिक (Satish Chandra Kaushik Passes Away) यांचे निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल अनुपम खेर यांनी ट्विट करून माहिती दिली. अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाच माहिती अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी दोन्ही छायाचित्रासह ट्विट करुन दिली. सतीश कौशिक यांनी प्रतिष्ठित नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षण घेतले. जाने भी दो यारों, उडता पंजाब, मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. तेरे नाम आणि मुझे कुछ कहना है या चित्रपटांचेही त्यांनी दिग्दर्शन केले.

अभिनेते अनुपम खेर यांनी लिहिले की, "मला माहित आहे की "मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे!" पण मी माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता की मी जिवंत असताना माझा जिवलग मित्र सतीश कौशिक यांच्याबद्दल ही गोष्ट लिहीन. असा अचानक पूर्णविराम. 45 वर्षांच्या मैत्रीवर. सतीश तुझ्याशिवाय आयुष्य कधीच सारखे होणार नाही. ओम शांती.

सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी झाला होा. ते एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, विनोदकार आणि पटकथा लेखक होते.