Saroj Khan Funeral: सरोज खान यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी रवाना, शोकसागरात बुडाले संपूर्ण बॉलिवूड
हृद्यविकाराचा तीव्र झटक्याने सरोज खान यांनी गुरुनानक रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्या कारणाने त्यांना 20 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते."
बॉलिवूडच्या माध्यमातून नृत्याला एक विशिष्ट दर्जा प्राप्त करुन देणा-या नृत्यदिग्दर्शिक सरोज खान (Choreographer Saroj Khan) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. त्यांची झालेली ही एक्झिट बॉलिवूड जगताला चटका लावणारी आहे. बांद्रयातील गुरुनानक रुग्णालयात (Gurunanak Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सांगितले जात आहे की, त्यांचे अंत्य संस्कार आजच केले जातील. यासाठी त्यांचे पार्थिव गुरुनानक रुग्णालयातून दफनभूमीकडे रवाना झाले आहे.
न्यूज एजन्सी ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, "सरोज खान यांचे अंतिम संस्कार मालवणी, मालाड (मुंबई) मध्ये केले जातील. हृद्यविकाराचा तीव्र झटक्याने सरोज खान यांनी गुरुनानक रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्या कारणाने त्यांना 20 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते."
तसेच सरोज खान यांची कोविड-19 ची चाचणीही करण्यात होती. जी निगेटिव्ह आली होती. त्यांच्या निधनाने त्यांचे जगभरातील लाखो चाहते सोशल मिडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तसेच अनेक बॉलिवूड कलाकारही सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.