सारा अली खान ने शेअर केला काशी विश्वनाथ मंदिराच्या बाहेरील सुंदर क्षण; 'तू मुस्लिम आहेस हे विसरू नकोस' म्हणत ट्रोलर्सने सुनावले
अर्थात तू धर्म विसरून हिंदू मंदिरात दर्शन का घेतलेस असा त्याचा सवाल आहे, ज्यावर साराने मात्र मौन बाळगले आहे.
बोल्ड अँड ब्युटीफुल बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हि लव्ह आज कल (Love Aaj Kal) सिनेमाच्या नंतर व्हेकेशन मोड मध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपली आई अमृता सिंह (Amrita Singh) आणि भाऊ इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) यांच्या सोबत मालदीव ट्रीप केली हाती तर आता होळीच्या निमित्ताने ती बनारसच्या गल्लीबोळात आपली सुट्टी घालवतेय. अलीकडेच तिने वाराणसी (Varanasi) येथे काशी विश्वनाथ मंदिरात (Kashi Vishwanath Mandir) जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले आणि मंदिराभाराचे काही खास क्षण आपल्या फॅन्ससोबत शेअर केले. तिचा हा श्रद्धाळू अंदाज तिच्या फॅन्सच्या जरी पसंतीस उतरला असला तरीही काहींनी मात्र तिला यावरून सुद्धा विनाकारण ट्रोल केले आहे. साराच्या या मंदिराच्या बाहेरील व्हिडिओवर एका इंस्टाग्राम युजरने तू हे विसरू नकोस की तू मुस्लिम आहेस अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. अर्थात तू धर्म विसरून हिंदू मंदिरात दर्शन का घेतलेस असा त्याचा सवाल आहे, ज्यावर साराने मात्र मौन बाळगले आहे.
सारा ने आपल्या व्हिडीओखाली कॅप्शन लिहिताना, वाराणसी शहराचे गोडवे गायले आहेत, "मी वाराणसी मधून बोलत आहे, इथे अगदी कमी खर्चात खूप मजा येईल इतके आम्ही फिरत आहोत, हा दिवस आणि हे शहर खूप सुंदर आहे,मी इथेच कायम राहू शकले असते तर छान झाले असते" अशा आशयाचे कॅप्शन साराने लिहिले आहे. जर का तुम्ही साराला फॉलो करत असाल तर वेगवेगया ठिकाणी जाऊन टुरिस्ट प्रमाणे जागांची माहिती देत ती व्हिडीओ काढत असते हे ही तुम्हाला ठाऊक असेल अशाच धाटणीचा हा सुद्धा एक व्हिडीओ आहे.
पहा सारा अली खान हिची पोस्ट
दरम्यान, सारा ने आजवर अनेकदा मंदिरात जाऊन पूजा अर्चना केली आहे, मुंबईत सुद्धा कित्येक वेळा तिला शनी मंदिरात स्पॉट केले जाते, त्यामुळे धर्म श्रद्धेत अडथळा बनतो असा विचार ती करत नाही. साराच्या सिनेमाच्या बाबत बोलायचं झालं तर लवकरच ती अक्षय कुमार आणि धनुष्य सोबत ती 'कुली नंबर 1' आणि 'अतरंगी रे' या सिनेमात दिसून येणार आहे.