Sanjay Raut on Kangana Ranaut: शिवसेनेवर टिका करणा-या कंगना रनौतला अप्रत्यक्षपणे संजय राऊतांनी दिले चोख उत्तर; वाचा ट्विट
कंगनाने राऊतांनी आपल्याला हरामखोर बोलल्याप्रकरणी स्पष्टीकरण देऊन शिवसेना महिलांचा अपमान करते असे म्हटल्यानंतर संजय राऊतांनी आज तिला ट्विटच्या माध्यमातून चोख उत्तर दिलं आहे.
अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे प्रकरण आता चांगलच तापलय. या दोघांचेही एकमेकांवर टिका करणे सुरु असून ट्विटच्या माध्यमातून ते एकमेकांवर टिकास्त्र सोडत आहे. काल कंगनाने राऊतांनी आपल्याला हरामखोर बोलल्याप्रकरणी स्पष्टीकरण देऊन शिवसेना महिलांचा अपमान करते असे म्हटल्यानंतर संजय राऊतांनी आज तिला ट्विटच्या माध्यमातून चोख उत्तर दिलं आहे. [Poll ID="null" title="undefined"]'शिवसेना नेहमीच महिलांच्या अस्मितेसाठी लढत राहिली आहे आणि राहणार' असे सांगत कंगनाला चोख उत्तर दिलं आहे.
संजय राऊतांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "शिवसेना नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या आदर्शांवर चालत आली आहे. त्यांनी आम्हाला नेहमी महिलांचा आदर करा असेच शिकवले आहे. तथापि, काही लोक अशी अफवा पसरवत आहे की, शिवसेना महिलांचा जाणून-बुजून अपमान करत आहे. जे लोक असा आरोप करतात त्यांनी एक गोष्ट विसरली नाही पाहिजे की ते मुंबई आणि मुंबईच्या मुंबा देवीचा अपमान करत आहे. शिवसेना नेहमी महिलांच्या अस्मितेसाठी लढत राहिल. हीच शिकवण आम्हाला आमच्या सुप्रीमों नी सुद्धा दिली आहे."
हेदेखील वाचा- Kangana Ranaut on Sanjay Raut: संजय राऊत मी तुमची निंदा करते, तुम्ही महाराष्ट्र नाही आहात; कंगना रनौत हिचे सडेतोड उत्तर
दरम्यान कंगनाने काल 'मला हरामखोर म्हणणा-या तुमच्या सारख्या मानसिकता असणा-या लोकांची आणि महिलांचा अपमान करणा-यांची मी निंदा करते. संजय राऊत मी तुमची निंदा करते. तुम्ही महाराष्ट्र नाही आहात. त्यामुळे तुम्ही असं बोलू शकत नाही की मी महाराष्ट्राची निंदा करतेय' असे संजय राऊतांना म्हटले होते.