बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणार संजय दत्त? दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी ट्विट मधून दिली हिंट
बाजीप्रभू देशपांडे (Bajiprabhu Deshpande) यांची पावन खिंडीतील (Pavan Khind) लढाई दाखवणाऱ्या या सिनेमात संजय दत्त्त हे बाजीप्र्भु यांच्या भुमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.
वीर तान्हाजी मालुसरे (Tanhaji Malusare) यांच्यावरील सिनेमानंतर आता आणखीन एका शिवकालीन वीराचा इतिहास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. बाजीप्रभू देशपांडे (Bajiprabhu Deshpande) यांची पावन खिंडीतील (Paavan Khind) लढाई दाखवणाऱ्या या सिनेमाची निर्मिती ही .. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांकडून करण्यात येणार आहे, अलीकडे केवळ घोषणाच झाली असता आतापासूनच या चित्रपटाची हवा प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे, सोबतच बाजीप्रभू यांच्या भूमिकेत कोण दिसणार हाही प्रश्न उत्साही प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे, अलीकडेच ट्विटर च्या माध्यमातून या सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे (Abhijeet Deshpande) यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे, अभिजित यांनी थेट नावाची घोषणा केली नसली तरी एका सध्या ओके मधून त्यांनी हिंट दिली आहे. झालं असं की एक ट्विटर युजरने अभिजित यांना ट्विट करत तुम्ही बाजीप्रभू यांच्या भूमिकेसाठी संजय दत्त (Sanjay Dutt) यांनाच निवडा असे सांगितले होते, यावर उत्तर देताना अभिजित यांनी ओके म्हंटले आहे.
काही दिवसांपूर्वी अभिजित देशपांडे यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या वरील या सिनेमाची घोषणा केली होती. दिवाळी 2020 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असून याचे नाव सुद्धा पावन खिंड असे असणार आहे.
अभिजित देशपांडे ट्विट
पहा पावन खिंड सिनेमाच्या पोस्टरची झलक
दरम्यान, बाजीप्रभू यांच्या भूमिकेत कोण दिसणार तसेच अन्य पात्र कोण साकारणार या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याकरिता निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहावी लागणार आहे. तान्हाजी यशानंतर पावन खिड सिनेमाकडून सुद्धा प्रेक्षकांना खुप अपेक्षा आहेत हे मात्र सह्दयाच्या उत्साहातून स्पष्ट दिसत आहे.