Sanjay Dutt New Look: कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या अभिनेता संजय दत्त चा नवा लूक, त्याची ही अवस्था पाहून चाहते म्हणाले 'Get Well Soon'
पिळदार देहयष्टी असलेला संजय या फोटोमध्ये एकदम बारीक झालेला दिसत आहे. ई-टाईम्स द्वारा हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.
अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याला फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे समजताच त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. हा धक्का त्यांच्या चाहत्यांना जितका न पचवता येण्यासारखे तसेच त्याच्या कुटूंबालाही. संजय सध्या मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) उपचार घेत आहे. त्यात अलीकडेचा त्याचा एक चाहत्यासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये त्याचा अवतार पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित आहे. तो धक्का पचवतो ना पचवतो तोच त्याच्या चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे. संजय दत्त चा नवा लूक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
संजयचा हा नवा लूक पाहून त्याचे चाहते जितके आनंदात आहे त्यापेक्षा जास्त चिंतेत आहे. पिळदार देहयष्टी असलेला संजय या फोटोमध्ये एकदम बारीक झालेला दिसत आहे. ई-टाईम्स द्वारा हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. Sanjay Dutt Health Update: संजय दत्त याच्यासोबत चाहत्याने काढलेला सेल्फी व्हायरल, अभिनेत्याचा लूक पाहून व्हाल हैराण
हा फोटो पाहून त्याच्या चाहते फार चिंतेत असून या फोटोखाली त्यांनी संजय दत्त ला लवकर बरा हो असे सांगत Best Wishes दिले आहे. या फोटोमध्ये संजय दत्त काळा चश्मा लावून हातात मोबाईल घेऊन त्यामध्ये बिझी असलेला दिसत आहे.
संजय दत्त सध्या कोकिलाबेन रुग्णालयात किमोथेरपी घेत असून आतापर्यंत 2 थेरपी झाल्या आहेत. संजयच्या या कठीण काळात त्याची पत्नी मान्यता दत्त आणि बहिण प्रिया दत्त या दोघेही त्याला प्रचंड साथ देत आहेत. अलीकडेच त्याची पत्नी मान्यता दत्त हिने अफवांवर विश्वास न ठेवता आमच्या परिवारासाठी आणि संजयसाठी प्रार्थना करा असे म्हटले होते.