Sameera Reddy Tested COVID Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा उद्रेक! नील नितीन मुकेश नंतर अभिनेत्री समीरा रेड्डी हिची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह

"मी काल कोरोना पॉझिटिव्ह (COVID Positive) आली आहे" अशी माहिती तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिली असून एक मोठी पोस्ट केली आहे.

Sameera Reddy (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडभोवती कोरोनाचा फास अधिकाधिक घट्ट होत चालला असून आतापर्यंत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच सकाळी नील नितीन मुकेश च्या संपूर्ण परिवाराला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) हिची देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. समीराने आपल्या सोशल अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. "मी काल कोरोना पॉझिटिव्ह (COVID Positive) आली आहे" अशी माहिती तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिली असून एक मोठी पोस्ट केली आहे.

"माझी काल कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. आम्ही सुरक्षित आहोत आणि आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. आम्ही घरीच क्वारंटाईन राहणार आहे. देवाच्या कृपेने माझी सासू सुरक्षित आहे. मला माहित आहे की, माझ्या चेह-यावर हसू आणण्यासाठी तुमच्याजवळ चांगल्या गोष्टी आहेत. त्या मला सकारात्मक राहण्यासोबत मजबूत राहण्यास मदत करतील. आपण सर्व यात एकत्र आहोत. सुरक्षित राहा" अशी पोस्ट समीराने केली आहे.हेदेखील वाचा- Arjun Rampal Tests Positive For COVID-19: अर्जुन रामपाल याला कोविड-19 ची बाधा; सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

Sameera Reddy Post (Photo Credits: Instagram)

अभिनेता नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) याच्यासह परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नील याची दोन वर्षांची मुलगी नूरवी हिचे सुद्धा कोरोनाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.(Arjun Rampal Tests Positive For COVID-19: अर्जुन रामपाल याला कोविड-19 ची बाधा; सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती)

दरम्यान नील नितीन मुकेश याने इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या पूर्ण कुटूंबाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याने असे म्हटले आहे की, ''प्रत्येक प्रकारे सावधगिरी बाळगा आणि घरात राहून सुद्धा, माझ्या परिवारातील लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही सर्वजण क्वारंटाइन झालो असून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेत आहोत. तसेट सर्व नियमांचे सुद्धा पालन केले जात आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यासाठी धन्यवाद. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. त्याचसोबत नील याने म्हटले की, तुमचे प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे.पणही स्थिती गंभीर असून ती हलक्यात घेऊ नका.''

याआधी आमिर खान, सोनू सूद, आशुतोष राणा, आर माधवन, कैटरिना कैफ, आलिया भट, रणबीर कपूर यांसारख्या अनेक बड्या स्टार्सना कोरोनाची लागण झाली होती.