Main Chala Song Released: सलमान खान चे 'मैं चला' गाणे रिलीज, अवघ्या काही मिनिटांत मिळाले लाखो व्ह्यूज; Watch Video

या गाण्यात सलमान प्रज्ञासोबत दिसत आहे, तर दुसरीकडे या गाण्याला सुपरहिट गायक गुरु रंधावाने आवाज दिला आहे.

Salman Khan Main Chala Song (Photo Credit - You Tube)

Main Chala Song Released: बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) ने याअगोदर सोशल मीडियावर त्याच्या आगामी 'मैं चला' (Main Chala) या गाण्याचा टीझर शेअर करून चाहत्यांना उत्साहित केले होते. अशातचं आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून सलमानचे 'मैं चला' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात सलमानसोबत प्रज्ञा जैस्वाल (Pragya Jaiswal) दिसत आहे. सलमान खानचे हे गाणे चाहत्यांना खूपचं आवडले असून चाहते सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सलमान खानच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'मैं चला' हे गाणे रिलीज होताच हिट झाले आहे. या गाण्याला 20 मिनिटांत जवळपास 3 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात सलमान खानचा पगडी लूक चाहत्यांना भूरळ घालत आहे. याआधी सलमान अंतिम चित्रपटामध्येही सरदारच्या भूमिकेत दिसला होता. (वाचा - Priyanka Chopra-Nick Jonas First Baby: प्रियंका चोपड़ा Surrogacy द्वारा झाली आई; सोशल मीडीयात शेअर केली गूड न्यूज!)

दरम्यान, सलमान खानचे हे नवीन गाणे चाहत्यांना खूप आवडत असून ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या गाण्यात सलमान प्रज्ञासोबत दिसत आहे, तर दुसरीकडे या गाण्याला सुपरहिट गायक गुरु रंधावाने आवाज दिला आहे. त्याचबरोबर या गाण्यात गुरूला गायिका म्हणून युलिया वंतूरने साथ दिली आहे. हे दोघेही गाण्यात दिसत आहेत.

सलमान खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, टायगर सिरिजच्या तिसर्‍या भागात कतरिनासोबत इमरान हाश्मी दिसणार आहे. दुसरीकडे, सलमान खान किक 2, पवन पुत्र भाईजान, कभी ईद कभी दिवाळी आणि नो एंट्रीचा सिक्वेलमध्ये दिसणार आहे. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या पठाणमध्ये सलमान खान एक कॅमिओ करणार आहे.