Farmers Protest: शेतकरी आंदोलनावर सलमान खान ने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रीया; पहा काय म्हणाला (Watch Video)

अद्याप केंद्र सरकारने यावर कोणताही तोडगा काढलेला नाही. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आता सलमान खान ने शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे.

Salman Khan (Photo Credits: Instagram)

नव्या कृषी कायद्यावरुन शेतकरी गेल्या 70 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. अद्याप केंद्र सरकारने यावर कोणताही तोडगा काढलेला नाही. आता या आंदोलनाचे पडसात जगभरात उमटत असून अनेक इंटरनॅशनल सेलिब्रिटींनी याला पाठिंबा दर्शवला आहे तर अनेक भारतीय सेलिब्रिटींनी भारताने एकजूटीने उभे राहण्याचा संदेश दिला आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगन (Ajay Devgn) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आता सलमान खान (Salman Khan) ने शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे.

सलमान खान काल रात्री एका टीव्ही शो लॉन्चदरम्यान मीडियाशी बोलताना सलमान खानने आपली शेतकरी आंदोलनावर आपले मत व्यक्त केले. सुरुवातीला शेतकरी आंदोलनाचा प्रश्न टाळण्याच्या तयारीत असलेला सलमान नंतर मात्र आपले मत मांडताना व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सलमान म्हणाला की, "जे योग्य आहे ते व्हायला पाहिजे, सर्वांसोबत योग्य गोष्टी व्हायला हव्यात." विशेष म्हणजे सलमानने या मुद्यावर कोणा एकाची बाजून घेतली नाही. फक्त जे योग्य असेल ते व्हायला हवे असे तो म्हणाला. (Akshay Kumar On Farmers Protest: केंद्र सरकारच्या समर्थनार्थ अभिनेता अक्षय कुमार मैदानात, सोशल मीडियावर कृषी कायद्यास पाठिंबा)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

(हे ही वाचा: Salman Khan Shoots for Antim: 'अंतिम' चित्रपटाच्या सेटवरून लीक झाले सलमान खानचे 'हे' फोटो; पहा खास छायाचित्र)

दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाब यांसारख्या राज्यात शेतकरी नोव्हेंबर 2020 पासून आंदोलन करत आहेत. शांततापूर्वक सुरु असलेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर रॅलीत मात्र हिंसाचार झाला. दरम्यान, यावरुन केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात सुरु असलेल्या संघर्षावर कोणताही तोडगा निघालेला नाही.