Salman Khan: मुंबईतील वांद्रे येथे सलमान खान बांधणार 19 मजली हॉटेल! बीएमसीकडून मिळाला ग्रीन सिग्नल
बॉलिवूडचे दिग्गज तारे अनेक दिवसांपासून मुंबईत लाखो कोटी रुपयांच्या मालमत्तांची गुंतवणूक आणि खरेदी करत आहेत. दररोज स्टार्स लक्झरी अपार्टमेंट आणि बंगले खरेदी करतात. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूडचा देखणा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan).
गेल्या 100 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक असे कलाकार आहेत जे देशातील लोकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. बॉलिवूडचे दिग्गज तारे अनेक दिवसांपासून मुंबईत लाखो कोटी रुपयांच्या मालमत्तांची गुंतवणूक आणि खरेदी करत आहेत. दररोज स्टार्स लक्झरी अपार्टमेंट आणि बंगले खरेदी करतात. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूडचा देखणा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan). सलमान खानबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, सलमान खान मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडवर असलेल्या भूखंडावर हॉटेल बांधण्याचा विचार करत आहे. हा भूखंड समुद्र किनाऱ्यावर वसलेला आहे.
बीएमसीने इमारतीच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे 19 मजली हॉटेल असणार आहे. या प्लॉटमध्ये पूर्वी स्टारलेट कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी होती, जिथे खान कुटुंबाचे अपार्टमेंट होते. सुरुवातीला या मालमत्तेवर गृहनिर्माण संस्था बांधण्याचे नियोजन होते, मात्र नंतर त्यात बदल करण्यात आला. (हे देखील वाचा: Adipurush New Song: आदिपुरुष चित्रपटातील 'जय श्री राम' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला (पाहा गाणे)
सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाच्या या 19 मजली हॉटेलची उंची 69.9 मीटर असेल. सादर केलेल्या प्रस्तावात या इमारतीत पहिल्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट असेल. तळघर दुसऱ्या मजल्यावर, जिम आणि स्विमिंग पूल तिसऱ्या मजल्यावर, तर चौथा मजला सर्व्हिस फ्लोअर म्हणून केला जाणार आहे. इमारतीचा पाचवा आणि सहावा मजला कन्व्हेन्शन सेंटर म्हणून वापरला जाणार आहे. इमारतीच्या आराखड्यात हॉटेलसाठी सातवा ते 19वा मजला ठेवण्यात आला आहे.
सलमान खानसोबत आणखी एक अभिनेता आहे जो रिअल इस्टेटमध्ये जास्त गुंतवणूक करतो. तो म्हणजे अॅक्शन अभिनेता जॉन अब्राहम. सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेता शेवटचा 'किसी ना भाई किसी की जान'मध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चांगले दाखवू शकला नाही. सलमान खान पुढे 'टायगर 3' मध्ये त्याचा अॅक्शन अवतार दाखवताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी दिसणार आहेत.
(The above story first appeared on LatestLY on May 20, 2023 09:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

