Salman Khan मुंबई मध्ये 5000 फ्रंटलाईन वर्कर्स साठी जेवणाची सोय पहायला स्वतः पोहचला ‘Bhaijaanz Kitchen’ मध्ये (Watch Video)

मागील वर्षी देखील सलमान खान ने ‘Being Haangryy’व्हॅनच्या माध्यमातून शहर सोडून जाणार्‍या मजुरांसाठी, गोर गरीबांसाठी, सिने क्षेत्रात रोजंदारीवर काम करणार्‍यांसाठी आर्थिक पाठबळ आणि अन्नधान्यांची सोय केली होती.

Salman Khan| Photo Credits: Twitter/Rahul Kannal

मुंबईला कोरोनाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी मागील काही दिवसांपासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक नियमावली अंमलात आणली आहे. शहरात संचारबंदी असल्याने पोलिस कर्मचारी ठिकठिकाणी नाकेबंदी करताना दिसत आहेत. पोलिसांसोबतच बीएमसी स्वच्छता कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करत आहेत. याच फ्रंटलाईन वर्कर्सची मुंबईच्या उन्हात खाण्या-पिण्याची आबाळ होऊ नये म्हणून सलमान खान कडून विशेष तसवीज केली जात आहे. काल (25 एप्रिल) सलमान खान (Salman Khan) या फ्रंटलाईन वर्कर्सच्या जेवणाची सोय पाहण्यासाठी स्वतः जातीने हजर होता. त्याचा चव चाखताना आणि सारी सोय कशी ठेवली जाते? याची पाहणी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

मुंबई मध्ये भाईजान किचन मध्ये यासाठी सोय करण्यात आली होती. युवासेनेचा राहुल कंनल त्याच्या स्वयंसेवी संघटनेकडून या जेवण वाटपाचं काम पाहतो. सलमान खानच्या वायरल व्हिडीओ मध्ये तो देखील सलमानला माहिती देत असल्याचं पहायला मिळालं आहे. इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना त्याने,'रविवारी 5 हजार जणांसाठी ही विशेष सोय केल्याचं म्हटलं आहे. सध्या ही फूड पॅकेट्स भायखळा ते जुहू आणि वांद्रे ईस्ट ते बीकेसी भागात, जम्बो कोविड सेंटर मध्ये दिली जाणार असल्याचं सांगितलं. येत्या काही दिवसांत ही संख्या दुप्पट केली जाईल' असेदेखील त्यानं म्हटलं आहे. COVID 19 In Mumbai: बॉलिवूड कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन्स आता मुंबईत नाकेबंदीसाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या दिमतीला.

सलमान खानची भेट

मागील वर्षी देखील सलमान खान ने ‘Being Haangryy’व्हॅनच्या माध्यमातून शहर सोडून जाणार्‍या मजुरांसाठी, गोर गरीबांसाठी, सिने क्षेत्रात रोजंदारीवर काम करणार्‍यांसाठी आर्थिक पाठबळ आणि अन्नधान्यांची सोय केली होती.

सध्या चित्रीकरण महाराष्ट्रात थांबलं असल्याने अनेक कलाकार सिनेक्षेत्रातील कामं थोडी बाजूला ठेवून समाजसेवेमध्ये हातभार लावताना दिसत आहेत.