Radhe Poster Out: प्रतिक्षा संपली! सलमान खान च्या 'राधे' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी होणार सिनेमा रिलीज

कारण एकदा मी जी....' असे कॅप्शन दिले आहे. थोडक्यात आपण चाहत्यांना दिलेली कमिटमेंट आपण पाळली असे त्याला सांगायचे आहे.

Radhe Release Date (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) याच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'राधे' (Radhe) चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता त्याच्या असंख्य चाहत्यांना लागली होती. ही उत्कंठा अधिक ताणून न ठेवता सलमान खानने आपल्या चाहत्यांना दिलेले कमिटमेंट पाळले आहे. सलमानाने नुकतेच आपल्या आगामी 'राधे' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले असून या द्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे. येत्या 13 मे ला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सलमानने हे पोस्टर आपल्या सोशल अकाउंटवर पोस्ट करत आपण 'ईदची कमिटमेंट दिली होती. त्यामुळे ईदलाच तुम्हाला भेटायला येणार आहे.' असे हटके कॅप्शन या पोस्टला दिले आहेत.

सलमान खानने राधे चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करुन 'ईद ची कमिटमेंट दिली होती, ईदला येणार. कारण एकदा मी जी....' असे कॅप्शन दिले आहे. थोडक्यात आपण चाहत्यांना दिलेली कमिटमेंट आपण पाळली असे त्याला सांगायचे आहे.हेदेखील वाचा- Radhe to Release in Cinemas: सलमान खान याचा 'राधे' सिनेमा OTT फ्लॅटफॉर्म वर नाही तर सिनेमागृहात 'या' दिवशी होणार रिलीज

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

काही दिवसांपूर्वी हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होईल अशी चर्चा होती. फिल्म ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी राधे सिनेमाबद्दल चालेल्या चर्चेला आपल्या ट्विटच्या माध्यमातून पूर्णविराम दिला. तरण यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "राधे सिनेमा ओटीटी फ्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची केवळ अफवा आहे. सिनेमा निर्मात्यांचा निर्णय स्पष्ट आहे. राधे सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. ईद 2021 ला रिलीज करण्याचा उद्देश आहे."

राधे या चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पटानी (Disha Patani) दिसणार आहे. प्रभूदेवा (Prabhu Deva) दिग्दर्शित या चित्रपटाचे सलमान खान, सोहेल खान आणि रिल लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्माते आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif