Salman Khan चा 'Radhe' सिनेमाची फेसबुकवर 50 रुपयांत विक्री; 3 जणांविरोधात FIR दाखल
सलमान खान (Salman Khan) चा 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' (Radhe: Your Most Wanted Bhai) सिनेमा सिनेमागृह आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर रिलीज करण्यात आला आहे.
सलमान खान (Salman Khan) चा 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' (Radhe: Your Most Wanted Bhai) सिनेमा सिनेमागृह आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना अनेक पायरेडेट साईट्सवर सिनेमा लिक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर आता हा सिनेमा फेसबुक, व्हॉट्सअॅपद्वारे अवघ्या 50 रुपयांत विकला जात असल्याचीही घटना समोर येत आहे. दरम्यान, राधे सिनेमा रिलीज होण्यापूर्वी हा सिनेमा ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा सिनेमागृहात जावूनच पहा, असे आवाहन सलमान खानने खास व्हिडिओ जारी करत केले होते.
तसंच सिनेमा ऑनलाईन लीक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी वॉर्निंग देखील देण्यात आली होती. तरी देखील हा सिनेमा 50 रुपयांत ऑनलाईन आणि व्हॉट्सअॅपद्वारे विकला जात होता. या प्रकरणी मुंबईच्या सायबर क्राईम युनिटकडे एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. ही तक्रार एंटरटेनमेंट एंटरप्राईज या सिनेमाच्या निर्माती कंपनीने केली आहे.
टीव्ही 9 च्या रिपोर्टनुसार, सलमान खान फिल्म्सच्या मार्केटिंग हेड अपर्णा देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सिनेमा 5 भागांत ऑनलाईन विकण्यात येत होता. याप्रकरणी झी ने पायरेसी एजेन्सी एपिक्स सॉफ्टवेयर प्रायव्हेट लिमिटेडशी संपर्क केला आणि सिनेमाची अनधिकृत कॉपी डिलिट करण्यास सांगितले. (सलमान खान च्या 'राधे' चित्रपटाने पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई; जाणून घ्या चित्रपटाचे फर्स्ट डे कलेक्शन)
अश्विनी राघव नामक व्यक्ती फेसबुकवर हा सिनेमा विकत आहे, अशी माहिती झी ला मिळाली. त्यानंतर त्यांनी ग्राहक म्हणून सिनेमासाठी त्या व्यक्तीला संपर्क केला. त्यावर तिने 50 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. 50 रुपये दिल्यानंतर तिने सिनेमाच्या पायरेटेड कॉपीची लिंक पाठवली आणि त्यानंतर आश्विनी सह इतर 2 लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.