Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Out: सलमान खालच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, Watch Video

ट्रेलरमध्ये सलमान खान भाईजानच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि रोमान्सचा जबरदस्त तडका आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer (PC - You Tube)

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Out: अभिनेता सलमान खान (Salman Khan) चा बहुप्रतिक्षित 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच झाला आहे. ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानशिवाय व्यंकटेश, पूजा हेगडे आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये सलमान खान भाईजानच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि रोमान्सचा जबरदस्त तडका आहे.

ट्रेलरची सुरुवात सलमान खानच्या एंट्रीने होते आणि बॅकग्राउंडमध्ये त्याच्या आवाजात संस्कृत श्लोकांचे पठण होते. यानंतर पूजा हेगडे सलमानला विचारते, 'तुझे नाव काय आहे?' यावर सलमान म्हणाला, 'माझे नाव नाही. मला भाईजान या नावाने ओळखले जाते. पहिल्या नजरेतच पूजा सलमान खानच्या प्रेमात पडते आणि सलमान खानला भाईजान म्हणत असताना तिची जीभ तोतरी होते. त्यानंतर ती त्याला 'जान' म्हटलं तर चालेल का विचारते. (हेही वाचा - Salman Khan New SUV: जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर सलमान खानने खरेदी केली बुलेटप्रूफ एसयूव्ही; काय आहे किंमत? जाणून घ्या)

सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. पूजा हेगडे तिच्या 'जान'ची म्हणजेच सलमान खानची तिच्या भावाशी (व्यंकटेश) ओळख करून देते. इथे कथेला नवे वळण मिळते. खरंतर, पूजा हेगडेच्या आयुष्यात एक खलनायक आहे आणि हा खलनायक म्हणजे जगपती बाबू. पूजा हेगडे आणि तिच्या कुटुंबाला वाचवण्याची जबाबदारी सलमान खानने उचलली आहे.

ट्रेलरमध्ये अॅक्शनचा जबरदस्त डोस आहे. यामध्ये सलमान खान जगपती बाबू आणि विजेंद्र सिंग यांना स्टाईलमध्ये मारहाण करताना दिसत आहे. 'मी माणूस म्हणून माणुसकीला साथ देईन' असं सलमान खान ट्रेलरमध्ये म्हणताना दिसतोय. 'ये हिंसा नहीं, सेल्फ डिफेन्स है', 'पॉवर नही, इच्छाशक्ती...' दरम्यान, पूजा हेगडे तिच्या क्युट स्माईलने चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे.