Salman Khan ने साजरा केला बॉडीगार्ड जग्गी चा बर्थडे; केक मिळताच केली अशी गंमत (Watch Video)
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान सध्या अंतिम या आगामी सिनेमाचे शूटिंग करत आहे. दरम्यान, सिनेमाच्या सेटवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात सलमान खान त्याच्या बॉडीगार्ड जग्गीचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसत आहे.
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान (Salman Khan) सध्या 'अंतिम' (Antim) या आगामी सिनेमाचे शूटिंग करत आहे. दरम्यान, सिनेमाच्या सेटवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात सलमान खान त्याचा बॉडीगार्ड जग्गीचा (Bodyguard Jaggi) बर्थडे सेलिब्रेट करताना दिसत आहे. या व्हिडिओतही सलमानचा नटखट अंदाज पाहायला मिळत आहे. बॉडीगार्ड जग्गीने केक कापल्यानंतर सलमान खान याला भरवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सलमान मस्त हुल देत केक खाणे टाळतो. सलमानच्या या गंमतीमुळे बर्थडे सेलिब्रेशनसाठी जमलेले सर्वच हसू लागतात.
सलमान खान चा हा व्हिडिओ 'अंतिम' (Antim: The Last Truth) सिनेमाच्या सेटवरील आहे. हा व्हिडिओ वुम्पला ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (Salman Khan Shirtless Photo: सलमान खान शर्टलेस फोटो सोशल मिडियावर झाला व्हायरल, फिट बॉडी पाहून चाहते झाले थक्क)
पहा व्हिडिओ:
View this post on Instagram
अलिकडेच सलमान खानचा अजून एक व्हिडिओ 'अंतिम' सिनेमाच्या सेटवरुन समोर आला होता. त्यात सलमान पगडी घालून दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंतिम सिनेमामध्ये सलमान खान एका शिख व्यक्तीची भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram
सलमान खान याच्या या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. या सिनेमात आयुष शर्मा एका गँगस्टरच्या भूमिकेत असून सलमान खान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, सध्या सलमान खान बिग बॉसच्या 14 व्या सीजनचे होस्टिंग करत आहे. आगामी 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या सिनेमात सलमान खान अभिनेत्री दिशा पटानी सोबत झळकणार आहे. या सिनेमात रणदीप हुड्डा देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर 'कभी ईद कभी दिवाली' या सिनेमातूनही सलमान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2020 04:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

