Salman Khan Birthday Special: सलमान कडे असलेली एकूण संपत्ती वाचून तुम्हालाही बसेल धक्का; महागड्या गाड्या ते बीच हाऊस...

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याचा आज वाढदिवस आहे. यंदा सलमान त्याचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. या आधी त्याने एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार तो त्याचा खास दिवस त्याच्या बहिणीसोबत तसेच त्याच्या कुटुंबियांसोबत साजरा करणार आहे.

Salman Khan (Photo Credits: File Image)

Salman Khan Birthday Special: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याचा आज वाढदिवस आहे. यंदा सलमान त्याचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. या आधी त्याने एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार तो त्याचा खास दिवस त्याच्या बहिणीसोबत तसेच त्याच्या कुटुंबियांसोबत साजरा करणार आहे. दरम्यान, आजच्या या खास दिवशी तुम्ही हे वाचून नक्कीच थक्क व्हाल की ता दबंग खानचे लाखो चाहते हे त्याच्या बांद्राला असलेल्या घराखाली त्याची एक झलक पाहण्यासाठी जमा होतात. परंतु याहीपेक्षा आश्चर्याची बाब म्हणजे सलमानकडे काही इतक्या महागड्या वस्तू आहेत ज्या ऐकून तुम्हालाही बसेल धक्का.

सलमानची गोराई बीच जवळ खूप मोठी प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीमध्ये जिम, स्विमिंग पूल, सिनेमागृह व त्यासोबत 5 बीएचके बंगला असा मोठा परिसर आहे. इतकंच नव्हे तर समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या या बंगल्यात डर्ट बाईक चालविण्याकरिता एक स्पेशल जागा देखील आहे. काही वेबसाईट्स ने दिलेल्या वृत्तानुसार या बंगल्याची किंमत जवळपास 100 करोड आहे.

पनवेलमध्ये त्याचे एक फार्म हाऊस आहे जे 150 एकर जागेमध्ये बनवले आहे. मुख्य म्हणजे या फार्म हाऊसमध्ये जिम, डान्स फ्लोर, स्विमिंग पूल, घोडे तसेच अनेक जनावरे आहेत. आणि या बंगल्याची किंमत जवळपास 80 करोडपर्यंत आहे.

याशिवाय त्याच्याकडे प्रायवेट यॉच म्हणजेच एक जहाज आहे. त्याच्या अलिबागमध्ये असलेल्या फार्म हाऊसला जाण्याकरिता या छोट्या जहाजाचा वापर तो करतो. या यॉचची किंमत जवळपास 3 करोड रुपये एवढी आहे.

Salman Khan त्याचा 54 वा Birthday साजरा करणार 'या' व्यक्तीसोबत

याशिवाय सलमानकडे असलेल्या महागड्या गाड्या आणि मोटर सायकलची मोठी यादी आहे.  याशिवाय सलमानकडे असलेल्या महागड्या गाड्या आणि मोटर सायकलची मोठी यादी आहे. या गाड्यांच्या यादीत Mercedes Benz GL Class (अंदाजे 80 लाख रुपये) Mercedes Benz S Class (अंदाजे 82 लाख) Audi A8 L (अंदाजे 1.13 करोड) BMW X6 (अंदाजे 1.15 करोड) Toyota Land Cruiser (अंदाजे 1.29 करोड), the Audi RS7 (अंदाजे 1.4 करोड) आणि Range Rover (2.06 करोडच्या वर), Audi R8 (अंदाजे 2.30 करोड) आणि Lexus LX470 (अंदाजे 2.32 करोड) या सर्व गाड्या आहेत. तर सलमान खानकडे असलेल्या हायाबुसा गाडीची किंमत 16 लाख रुपये एवढी आहे. तसेच त्याच्याकडे यामाहा R1, Suzuki GSX-R 1000Z, Suzuki Intruder M1800 RZ या मोटार सायकल आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now