Dil De Diya Song Video Out: Salman Khan आणि Jacqueline Fernandez च्या रोमँटिक केमिस्ट्रीसह ‘Radhe’ चित्रपटातील दुसरे गाणं रिलीज; पहा व्हिडिओ

त्याचप्रमाणे, कमल खान आणि पायल देव यांनी या गाण्याला आवाज दिला आहे आणि शबीना खानने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिज (Photo Credits: Youtube)

Dil De Diya Song Video Out: सलमान खानच्या चित्रपटाच्या म्यूझिक अल्बममधील ‘दिल दे दिया’ हे त्याचे दुसरे गाणे आज प्रसिद्ध झाले आहे. गाण्यात सलमान खान (Salman Khan) आणि जॅकलिन फर्नांडिज (Jacqueline Fernandez) नेहमीप्रमाणे आपल्या रोमँटिक शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. गुरुवारी या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या गाण्याचा टीझर प्रेक्षकांना खूपचं आवडला होता.

या पप्पी गाण्यामध्ये बीट्स आणि इलेक्ट्रिफाइंग ट्यून्सचे मिश्रण ऐकायला मिळत आहे. यात जॅकलिन एथनिक ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने अतिशय सुंदररित्या हे गाणं सादर केलं आहे. तर सलमान नेहमीप्रमाणेचं ब्लॅक कॅज्युअल सूटमध्ये दिसत आहे. जॅकलिन आणि सलमान यांच्यातील सिझलिंग केमिस्ट्री प्रेक्षकांना उत्साहित करताना दिसत आहे. (वाचा - Salman Khan चा चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ साठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू; येथे करू शकता बुकिंग)

या गाण्याबद्दल बोलताना जॅकलिन म्हणाली, "मी जेव्हा जेव्हा सलमानबरोबर कॉलेब्रेट करते, तेव्हा ते सर्वोत्कृष्ट असते. त्यांची उर्जा नेहमीचं मजबूत असते. राधे चित्रपटातील दिल दे दिया हे माझे आवडते गाणे आहे. माझ्या भूतकाळातील सर्व डान्सपैकी या गाण्यातील डान्स पूर्णपणे वेगळा आहे. तसेच नृत्य दिग्गज प्रभुदेवा सर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपचं वेगळा होता. शूटिंग दरम्यान आम्ही खूप मज्जा केली, असंही जॅकजिनने यावेळी सांगितलं.

या गाण्याला हिमेश रेशमिया यांनी संगीत दिले असून शब्बीर अहमद हे या गाण्याचे गीतकार आहेत. त्याचप्रमाणे, कमल खान आणि पायल देव यांनी या गाण्याला आवाज दिला आहे आणि शबीना खानने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

सलमान खान सोबतच्या या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' सलमान खान फिल्म्सने झी स्टुडिओसमवेत सादर केला आहे. सलमान खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित हा चित्रपट यंदा ईदच्या निमित्ताने 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.