सलमान खान याच्यासह बहिणाच्या विरोधात चंदीगढ मध्ये तक्रार दाखल, धाडले समन्स

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याची बहिणसह त्याची कंपनी Being Human च्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण चंदीगढ मधील एका व्यापाऱ्याने यांच्या विरोधात फसवणूकीचा आरोप लगावला आहे.

सलमान खान याच्यासह बहिणाच्या विरोधात चंदीगढ मध्ये तक्रार दाखल, धाडले समन्स
Salman Khan | (Photo Credits: Facebook)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान  (Salman Khan) आणि त्याची बहिणसह त्याची कंपनी Being Human च्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण चंदीगढ मधील एका व्यापाऱ्याने यांच्या विरोधात फसवणूकीचा आरोप लगावला आहे. व्यापाऱ्याने आरोप लावत असे म्हटले की, शो रुम सुरु केल्यानंतर कंपनी दिल्लीहून सामान पाठवत नाही आहे. कंपनीची वेबसाइट सुद्धा बंद आहे. आता व्यापाऱ्याने सलमान खान, त्याची बहिण अलवीरा खान आणि बिंग ह्युमनच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सलमान खान, अलवीरा आणि बिंग ह्युमनचे सीईो प्रसाद कपारे, संतोष श्रीवास्तव, संध्या, अनूप, संजय रंगा, मानव आणि आलोक यांना समन्स धाडले आहेत.

पोलिसात केलेल्या तक्रारीमध्ये व्यापारी अरुण गुप्ता यांनी म्हटले की, सलमान खन यांच्या सांगण्यावरुन त्यांनी मनीमाजराचे एनएसी एरिया जवळ 3 कोटी रुपयांचे बिंग ह्युमन ज्वेलरी शो रुम सुरु केले होते. शो रुम सुरु केल्यानंतर स्टाइल क्विंटेट ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एक करार केला होता. या सर्वांनी शो रुम तर सुरु केले पण कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. बिंग ह्युमन यांची ज्वेलरी ज्या स्टोर मधून त्यांना देण्यास सांगितली होती, ते बंद आहे. याच कारणास्तव त्यांना सामान सुद्धा मिळत नाही आहे.(लोकप्रिय अभिनेत्री Shagufta Ali यांच्यावर आर्थिक संकट; आईचे उपचार करायलाही पैसे नाहीत, विकली कार व दागिने)

व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर सलमान खान, अलवीरा खान अग्निहोत्री यांच्या व्यतिरिक्त कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना पोलिसांनी समन्स पाठवले आहेत. या सर्वांनी 10 दिवसात उत्तर देण्यास सांगितले आहे. व्यापारी अरुणने असे म्हटले की, सलमान खान याने त्यांना बिग बॉसच्या सेटवर बोलावले आणि कंपनीने सुरु केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले होते. सलमान खानने चंदीगढ मध्ये शोरुम सुरु करण्याबद्दल सु्द्धा बातचीत केली होती. तक्रारकर्त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा पोलिसांना पाठवली आहे. त्यांनी आरोप लगावला की, सलमान खान याने म्हटले होते तो शोरुमचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहे. मात्र नंतर वेळ नसल्याने आला नाही.

 

(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2021 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).