Tandav Trailer: सैफ अली खान, डिंपल कपाड़िया OTT प्लॅटफॉर्मवर 'तांडव' करायला सज्ज, पाहा दमदार ट्रेलर

हा चित्रपट अली अब्बास ज़फर यांनी दिग्दर्शित केला आहे.

Tandav Trailer (Photo Credits: YouTube)

बॉलिवूडमध्ये जास्त हिट देऊ न शकलेल्या स्टार्ससाठी OTT प्लेटफॉर्म एक वरदान ठरलंय जणू!... बॉबी देओल, अभिषेक बच्चन पाठोपाठ आता सैफ अली खान देखील वेबसीरिजच्या माध्यमातून OTT प्लेटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. लवकरच सैफ अली खानची नवी वेबसीरिज 'तांडव' प्रदर्शित होणार असून नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये सैफ अली खानसह डिंपल कपाड़िया आणि बरीच तगडी स्टारकास्ट दिसत आहे. या ट्रेलरवरून तरी यात राजकीय विषय मांडण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच यात सैफ आणि डिंपल कपाड़िया मध्ये जबरदस्त टशन पाहायला मिळत आहे.

तांडव च्या ट्रेलरवरुन हा पंतप्रधान बनण्याच्या विषयाला घेऊन असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट अली अब्बास ज़फर यांनी दिग्दर्शित केला आहे. पाहा तांडव चित्रपटाचा दमदार ट्रेलर

हेदेखील वाचा- Tribhanga Trailer: बॉलिवूड अभिनेत्री काजोल च्या 'त्रिभंगा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पहा हृदयस्पर्शी कथा

या ट्रेलरमध्य सैफ अली खान पंतप्रधान बनू इच्छित आहे. मात्र त्या पदासाठी डिंपल देखील जोरदार प्रयत्न करत आहे असे दिसत आहे. या दरम्यान या दोघांमध्ये चांगली टक्कर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि डिंपल कपाडिया शिवाय सुनील ग्रोवर, तिग्मांशु धूलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद जीशान आय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागरानी सारखी जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

तांडव ही वेबसीरिज 15 जानेवारीला अॅमेजॉन प्राईमवर प्रदर्शित केली जाणार आहे. राजकारणातील तांडव या चित्रपटात पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकही या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहे.