मराठमोळ्या सई मांजरेकर हिच्या लेहंग्यामधील नववधू च्या अवतारातील दिलखेचक अदा पाहून तुम्हीही व्हाल घायाळ; नक्की पाहा
यात ती खूपच सुंदर आणि गोड दिसत आहे.
'दबंग 3' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर (Saiee Manjrekar) सध्या अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. सोशल मिडियावरही ती खूप चर्चेत आहे. दबंग 3 मधून सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान सोबत काम करुन तिने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांसमोर पाडली. तिचा कमनीय बांधा, स्मित हास्य हे तिच्या चाहत्यांना अक्षरश: वेडं लावते. तिच्या प्रेमात पडावे असे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहे. नववधू या थीमवर एका फॅशन शो साठी तिने केलेला नववधूचा लूक सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये तिने सुंदर असा मरून रंगाचा नववधू चा लेहंगा परिधान केला आहे. यात ती खूपच सुंदर आणि गोड दिसत आहे.
पाहा फोटोज:
हेदेखील वाचा- Dabangg 3: मराठमोळ्या सई मांजरेकर चा सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा सोबत स्टायलिश अंदाज; 'दबंग 3' मध्ये करणार महत्वपूर्ण भूमिका
सईला आपल्या चित्रपटातून लाँच करण्यात सलमान खानचा मोठा वाटा आहे असे म्हणायला हरकत नाही. चित्रपटाच्या प्रमोशनपासूम सई खूपच चर्चेत आली आहे. किंबहुना तिच्या चित्रपटातील भूमिकेबद्दल कुणालाही काही खबर लागू नये म्हणून शूटिंग सेटवरही सलमानने अनेक निर्बंध आणले होते.
दबंग 3 या चित्रपटात सलमान आणि सोनाक्षी सिन्हा सारखे अनुभवी कलाकार असताना सईने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. या चित्रपटानंतर सईकडे अजून ब-याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या असतील हे वेगळं सांगायची गरज नाही.