Sai Tamhankar Birthday Special: वाढदिवसानिमित्त सई ताम्हणकर हिच्या बोल्ड फोटोजची झलक!
मराठी सिनेसृष्टीतील पहिली 'बिकिनी गर्ल' म्हणूनही सईला ओळखले जाते. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बोल्ड फोटोज एक झलक...
मराठी सिनेसृष्टीतील एक फ्रेश चेहरा म्हणून सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिच्याकडे पाहिले जाते. विविधढंगी भूमिका साकारुन सईने आपली वेगळी छाप सोडली आहे. 'दुनियादारी', 'वजनदार', 'क्लासमेंट्स', 'राक्षस', 'गर्लफ्रेंड', 'वायझेड' यांसारख्या सिनेमात सईने दमदार भूमिका साकारल्या आहेत. सईच्या काही भूमिकांमुळे तिची ओळख बोल्ड अभिनेत्री म्हणूनही झाली. बोल्ड अभिनेत्रीचा टॅग देखील सई तितक्याच ग्रेसफुली मिरवते. दरम्यान सईने काही साध्या सोज्वळ भूमिकाही साकारुन आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. आज 25 जून रोजी सुंदर, बोल्ड सई ताम्हणकर हिचा वाढदिवस आहे.
सई मूळची सांगलीची असून तिचा जन्म 25 जून 1986 मध्ये झाला. सईने मराठी सोबतच 'गजनी', 'हंटर' यांसारख्या हिंदी सिनेमातही भूमिका केल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीतील पहिली 'बिकिनी गर्ल' म्हणूनही सईला ओळखले जाते. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी सई तिच्या पोस्ट, फोटोजमुळे चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते. सईच्या वाढदिवसानिमित्त पाहुया तिच्या बोल्ड फोटोज झलक...
सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज:
View this post on Instagram
Makeup by yours truly 🙃! #saitamhankar #londondiaries #day1 #lovesonia #lovesoniainlondon
2020 मध्ये सईचा 'धुरळा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर 'सविता भाभी' हा बोल्ड आशय असलेला सिनेमाही यंदा प्रदर्शित झाला होता. विविध भूमिकांमधून रसिकांचे सातत्याने मनोरंजन करणाऱ्या सई ताम्हणकर हिला वाढदिवसानिमित्त लेटेस्टली मराठीकडून खूप शुभेच्छा!
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2020 09:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

