RRR Movie: 'आरआरआर' ऑस्करच्या शर्यतीत येण्याची शक्यता, 'या' विभागामध्ये चित्रपटाला मिळू शकते नामांकन
व्हरायटीनुसार, भारतीय बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'आरआरआर' चित्रपटाला त्याच्या 'दोस्ती' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीमध्ये नामांकन मिळू शकते.
एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित आरआरआरला (RRR) ऑस्कर (Oscar) मिळेल का? ज्युनियन एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) जोडीला उमेदवारी मिळेल का? यावेळी प्रत्येकजण या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. पण अचानक लोक ऑस्कर आणि आरआरआरबद्दल इतके प्रश्न का विचारू लागले? वास्तविक, अमेरिकेतील मीडिया कंपनी व्हेरायटीने ऑस्करसाठी विविध श्रेणींमध्ये नामांकन मिळणाऱ्या चित्रपटांची संभाव्य यादी जाहीर केली आहे. या यादीत समाविष्ट केलेल्या दोन श्रेणींमध्ये RRR चे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. व्हरायटीनुसार, भारतीय बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'आरआरआर' चित्रपटाला त्याच्या 'दोस्ती' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीमध्ये नामांकन मिळू शकते. एमएम कीरवानी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे चित्रपटातील राम चरण आणि जूनियर एनटीआर यांच्या मैत्रीवर आधारित आहे. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीमध्ये एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स मधील "दिस इज अ लाइफ", मॅव्हरिकचे "होली मु हँड" आणि टर्निंग रेडचे "नोबडी लाइक यू" सारख्या गाण्यांचाही समावेश आहे.
इतकंच नाही तर व्हरायटीनुसार सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये RRR चे नाव देखील समाविष्ट होऊ शकते. या श्रेणीत ऑस्कर जिंकण्याच्या शर्यतीत दिग्दर्शक सॅंटियागो मित्रेचा अर्जेंटिना 1985, अलेजांद्रो गोन्झालेझ इरिटूचा बार्डो, लुकास धोंटास क्लोज आणि अली अब्बासीचा होली स्पायडर यांचीही नावे आहेत. (हे देखील वाचा: Mahesh Babu सोबत Alia Bhatt मोठ्या पडद्यावर! SS Rajamouli यांच्या चित्रपटात दिसणार एकत्र)
550 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या एसएस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ज्युनियर एनटीआर आणि राम चरणची जोडी लोकांना इतकी आवडली की चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 903.68 कोटी रुपये कमावले. एवढेच नाही तर राजामौली यांच्या चित्रपटाला विदेशातही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या चित्रपटाने परदेशात 208.02 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. म्हणजेच जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकूण 1111.7 कोटींची कमाई केली. 1000 कोटींचा टप्पा पार करणारा एसएस राजामौली यांचा हा दुसरा चित्रपट आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)