Rohit Shetty New Cartoon: बालदिनाचे औचित्य साधून रोहित शेट्टी चा 'Smashing Simmba' येणार बच्चे कंपनीच्या भेटीला, 'या' वाहिनीवर होणार प्रसारण

यातील मुख्य कार्टूनला रणवीर सिंह चा सिम्बा मधील लूक देण्यात आला आहे. 'Pogo' वाहिनीवर हे कार्टून प्रसारित होणार आहे

Rohit Shetty New Cartoon Smashing Simmba (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) याने चित्रपटांसोबत आपल्या प्रोडक्शन हाऊसमधून अॅनिमेशनची सुद्धा निर्मिती केली आहे. Little Singham हे त्याचे पहिले कार्टून होते. जे बच्चे कंपनीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यापाठोपाठ आता रोहितचा आणखी एक हिट चित्रपटाचे कार्टून लवकरच लहान मुलांच्या भेटीला येणार आहे. मुख्य म्हणजे बाल दिनाचे औचित्य साधून 14 नोव्हेंबरपासून हे कार्टून सुरु आहे. या कार्टूनचे नाव आहे, 'Smashing Simmba'. या कार्टूनच्या रुपात रोहित शेट्टी बच्चे कंपनीला बालदिनादिवशी चांगलेच गिफ्ट देणार आहे असे म्हणायला हरकत नाही.

Smashing Simmba हे कार्टून येत्या 14 नोव्हेंबरपासून रोज दुपारी 1 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील मुख्य कार्टूनला रणवीर सिंह चा सिम्बा मधील लूक देण्यात आला आहे. 'Pogo' वाहिनीवर हे कार्टून प्रसारित होणार आहे. हेदेखील वाचा- Ranveer Singh New Film Cirkus: रणवीर सिंह-रोहित शेट्टी ही जोडी पुन्हा येणार एकत्र; पूजा हेगडे जैकलीन फर्नांडिससह दाखवणार 'सर्कस'

 

View this post on Instagram

 

Aala Re Aala #SmashingSimmba Aala! @itsrohitshetty, @rohitshettypicturez, @big_animation & #PogoTV announce their new action-packed animation series starting this Diwali, on 14th November. @reliance.entertainment @sarkarshibasish

A post shared by BIG ANIMATION (@big_animation) on

याबाबतीतील एक पोस्ट Big Animation या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले असून या नव्या कार्टूनची घोषणा करण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर बॉलिवूड पाठोपाठ आता अॅनिमेशन मध्ये रोहितची जादू पसरू लागली आहे.

रोहित शेट्टी च्या कामाविषयी बोलायचे झाले तर, लॉकडाऊनमुळे त्याचा रखडलेला चित्रपट 'सूर्यवंशी' ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, कैटरिना कैफ आणि रणवीर सिंह अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी ही जोडी पुन्हा एकत्र येणार असून यात पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस सुद्धा दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव सर्कस असेल.