100 कोटी कल्बमध्ये 8 सुपरहीट सिनेमे देणारा Rohit Shetty ठरला पहिला दिग्दर्शक!
शंभर कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणारा रोहित शेट्टीचा हा आठवा सिनेमा आहे.
100 कोटी कल्बमध्ये 8 सुपरहीट सिनेमे देणारा रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा ठरला पहिला दिग्दर्शक ठरला आहे. रोहित शेट्टीच्या सिनेमांचा बॉक्सऑफिसवर चांगलाच बोलबाला असतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सिम्बा' (Simmba) सिनेमाने 5 दिवसांत 124 कोटींचा गल्ला केला आहे. रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी चा Simmba 'पैसा वसूल' सिनेमा!
'सिम्बा'च्या यशाबद्दल रणवीर सिंगने रोहित शेट्टीचं खास अभिनंदन केलं आहे. 'ब्लॉकबस्टर किंग की जय हो... रोहित भाई सेंच्युरीवर सेंच्युरी करत चाललाय,' असं लिहित रणवीरनं खास पोस्ट शेअर केली आहे.
रोहित शेट्टीचा सिनेमा म्हणजे तगडी स्टार कास्ट, कॉमेडी, ड्रामा, रोमांस आणि अॅक्शनची पर्वणीच. सिनेमातील या खास वैशिष्ट्यांमुळे रोहित शेट्टीचे सिनेमे लक्षवेधी ठरतात. यापूर्वी रोहितच्या 'गोलमाल-3', 'सिंघम', 'बोल बच्चन', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'सिंघम रिटर्न्स', 'दिलवाले', 'गोलमाल अगेन' या सात सिनेमांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली होती.