ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सोबतचा शेअर केला बालपणीचा फोटो, दीदींनी दिली यावर भावूक प्रतिक्रिया, नक्की वाचा

हा फोटो शेअर करताना ऋषि कपूर जितके भावूक झाले होते त्याच्या पेक्षा जास्त भावूक लता दीदी हा फोटो पाहून झाला.

Rishi Kapoor And Lata Mangeshkar (Photo Credits: Twitter)

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) यांच्या हातातील गोबरे गोबरे गाल, टपोरे डोळे असलेले हे बाळ कोण आहे ओळखलात का? हे आहेत ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर (Rishi Kapoor). बॉलिवूडमधील नावाजलेले आणि प्रतिष्ठित घराण्यातील ऋषि कपूर यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल टाकले आणि बॉलिवूडला एका स्तरावर नेले. ओम शांति ओम, मेरा नाम जोकर, यादों की बारात, अमर अकबर अँथेनी, बॉबी हे त्यांचे गाजलेले चित्रपट. या चित्रपटाने न केवळ त्यांना ओळख मिळवून दिली तर अभिनयाचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर सादर केले. त्यांचा केवळ 3 महिन्याचा असतानाचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

खुद्द ऋषि कपूर यांनीच हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना ऋषि कपूर जितके भावूक झाले होते त्याच्या पेक्षा जास्त भावूक लता दीदी हा फोटो पाहून झाला.

पाहा ट्विट:

हेदेखील वाचा- कर्करोगाशी लढा देऊन 11 महिने, 11 दिवसांनतर ऋषी कपूर मायदेशी परतले; Watch Video

फ़ोटो देखके मुझे बहुत बहुत ख़ुशी हुई. मुझे भी ये फ़ोटो मिल नहीं रही थी। मुझे ये फ़ोटो देखके कृष्णा भाभी और राज साहब की याद आयी.ये फ़ोटो में भाभीने आपको मेरे हाथ में दिया था.आपने सबके साथ साँझा किया ये बहुत अच्छा किया.आपकी सेहत हमेशा अच्छी रहे यही ईश्वर से प्रार्थना अशा शब्दांत लतादींदींनी त्यांच्या फोटोला कमेंट केली आहे.

ऋषि कपूर लवकरच दीपिका पादुकोणच्या 'द इंटर्न' या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा हॉलिवूड सिनेमा 'द इंटर्न' चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात दीपिका आणि ऋषि कपूर यांच्या मुख्य भूमिका असणार आहे.