बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना काल (29 एप्रिल) मुंबईच्या Reliance Foundation Hospital दाखल करण्यात आलं होतं. 2018 मध्ये ऋषि कपूर यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यानंतर उपचारासाठी ते न्यूयॉर्कला रवाना झाले. सुमारे 11 महिन्यांपर्यंच्या उपचारानंतर ते भारतात परतले. 2019 सप्टेंबर मध्ये कॅन्सरवरील उपचारानंतर भारतात आले. अखेर आज (30 एप्रिल) त्यांची प्राणज्योत मालवली. या बहारदार अभिनेत्याच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून विविध स्तरातून त्यांना आदराजंली वाहण्यात येत आहे. बॉलिवूड कलाकारांसह राजकीय नेत्यांनी देखील ट्विट करत ऋषि कपूर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. (ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूड हळहळले; प्रियंका चोप्रा, रजनीकांत, अक्षय कुमार, अजय देवगण यांनी ट्वीटरच्या माध्यमातून अर्पण केली आदरांजली)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत ऋषि कपूर यांना श्रद्धाजंली वाहिली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ट्विट करत हे भारतीय सिनेमाचे मोठे नुकसान असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी ट्विट:
राजनाथ सिंह ट्विट:
29 एप्रिल रोजी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान याचे मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. इरफान खान याच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडकरांवर शोककळा पसरली आहे. तर इरफानच्या अचानक निधनाने त्याचा चाहतावर्ग हळहळला. त्यानंतर काही वेळातच ऋषि कपूर यांचे निधन चाहत्यांसह सिनेसृष्टीसाठी देखील मोठा धक्का आहे.