RIP Wajid Khan: वाजिद खान यांचा रुग्णालयातील जुना व्हिडिओ व्हायरल, गायिले दबंग चित्रपटातील लोकप्रिय गाणे

या व्हिडिओमध्ये वाजिद खान रुग्णालयातील बेडवर दबंग चित्रपटाचे शीर्षक गीत गाताना दिसत आहे.

Wajid Khan Video (Photo Credits: Viralbhayani/Instagram)

Wajid Khan Old Video in Hospital: बॉलिवूडची सुप्रसिद्ध संगीतकारांची जोडी साजिद-वाजिद यांच्यातील वाजिद खान (Wajid Khan) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती असेही सांगण्यात येत आहे. त्यांची अशी अचानक एक्झिट मनाला चटका लावणारी होती. ते गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजारानेही त्रस्त होते. त्यांच्या आज निधनामुळे सोशल मिडियावर त्याचे चाहते आणि बॉलिवूड जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान त्यांचा एक रुग्णालयातील जुना व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये वाजिद खान रुग्णालयातील बेडवर दबंग चित्रपटाचे शीर्षक गीत गाताना दिसत आहे. RIP Wajid Khan: प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये पसरली शोककळा, अमिताभ बच्चन, प्रियंका चोपड़ा पासून फराह खानसह अनेकांनी व्यक्त केले दु:ख

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A heart breaking old video of #wajidkhan . This is not a recent video. #rip

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

Wajid Khan Passes Away : प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे 42 व्या वर्षी निधन - Watch Video

वाजिद खान यांचे अचानक जाण्याने मनाला चटका लावणारे असल्यामुळे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अक्षय कुमार (Akshay Kumar), प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) सारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे. वर्सोव्याच्या स्मशानभूमीत वाजिद खान यांची दफनविधी करण्यात येत आहेत. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भाऊ साजिद खान (Sajid Khan), अभिनेता आदित्य पांचोलीसह (Aditya Pancholi) कुटूंबातील जवळच्या व्यक्तींनी हजेरी लावली.