Rio Kapadia Passes Away: प्रसिद्ध अभिनेते रिओ कपाडीया यांचे निधन; 'दिल चाहता है', 'चक दे इंडिया' चित्रपटांमध्ये साकारल्या होत्या अविस्मरनीय भूमिका
मेड इन हेवन 2 मध्ये त्यांच्या अभिनयाची शेवटची झलक पाहायला मिळाली होती. ज्यात त्यांनी मृणाल ठाकूरच्या वडिलांची भूमिका केली होती.
प्रसिद्ध अभिनेते रयो कपाडिया यांचे निधन (Rio Kapadia Passes Away) झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. आपल्या अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला. त्यांचया आकस्मिक निधनामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. कपाडिया यांनी 'दिल चाहता है' (Dil Chahta Hai), 'चक दे इंडिया' (Chak De India) आणि 'हॅपी न्यू इयर' (Happy New Year) यांसह अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. मेड इन हेवन 2 मध्ये त्यांच्या अभिनयाची शेवटची झलक पाहायला मिळाली होती. ज्यात त्यांनी मृणाल ठाकूरच्या वडिलांची भूमिका केली होती. त्यांच्या निधनाबद्दल आमचे सहकारी इंग्रजी पोर्टल लेटेस्टलीने वृत्त दिले आहे.
'चक दे इंडिया' आणि 'हॅपी न्यू इयर' सारख्या चित्रपटात अभिनय करणाऱ्या रिओ कपाडिया यांच्यावर उद्या म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप पुढे आले नाही. पण त्यांची एक्झीट अनेकांना चटका लावून जाणारी ठरली आहे. रिओचा अत्यंत निकटचा मित्र फैसल मलिक याने माहिती देताना सांगितले की, आज तीव्र दु:खाने सांगावे लागत आहे की, जवळचा मित्र रिओ कपाडिया आता आपल्यात राहिला नाही. आज म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12.15 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. उद्या 15 सप्टेंबर रोजी त्याच्याव मुंबई येथे अंत्यसंस्कार केले जातील.
ट्विट
कपाडिया यांनी जळपास 30 वर्षांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात काम केले. त्यांनी सुरुवातीला दूरदर्शनसारख्या जाहिरातींमथ्ये काम केले. त्यानंतर त्यांनी सपने सुहाने लडकपन के, कुटुंब, जुडवा राजा, क्योंकी सास भी कभी बहू थी यांसारख्या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्येही काम केले. सन 2013 मध्ये महाभारत या टीव्ही मालिकेमध्ये त्यांनी राजा गांधार साकारला. ज्याचे प्रचंड कौतुक झाले. ते सोशल मीडियावरही सक्रीय असत. इन्स्टाग्रामवर 5 जून रोजी त्यांनी शेवटची पोस्ट शेअर केल्याचे पाहायला मिळते.