Rhea Chakraborty Bail Update: रिया चक्रवर्ती, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा ला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
तसेच तिचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये (Sushant Singh Rajput Death Case) ड्रग्स कनेक्शनमध्ये NCB कडून अटकेत असलेली त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ला आज (7 ऑक्टोबर) जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) याची सुनावणी झाली असून रिया आज महिन्याभरानंतर तुरूंगाबाहेर येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रियाची सुटका केली असली तरीही तिचा भाऊ Showik Chakraborty आणि Abdul Parihar यांना जामीन नाकारला आहे. तर रियाला देखील जामीन देताना काही अटी शर्थी दिल्या आहेत. MSHRC on Rhea Chakraborty's Visit to Hospital Mortuary: मुंबई पोलिस, कूपर हॉस्पिटल कडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन नाही; महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग चा अहवाल.
मुंबई उच्च न्यायालयाने आज रिया चक्रवर्तीला जामीन देताना 1 लाखाच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. तसेच तिचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. सोबत मुंबई बाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या परवानगी नंतरच तिला बाहेर पडता येणार आहे. पुढील 10 दिवस तिला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपली हजेरी लावावी लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायलयाकडून रिया चक्रवर्तीला दिलासा
दरम्यान आज 5 जणांच्या जामीनावर सुनावणी झाली आहे. रिया सोबतच सुशांतकडे काम करणारे दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांना देखील जामीन मंजुर केला आहे. त्यांना देखील नजीकच्या पोलिस स्थानकामध्ये हजेरी लावावी लागणार आहे. 29 सप्टेंबरला बॉम्बे हायकोर्टात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आज निकालाचे वाचन झाले आहे. दरम्यान Justice SV Kotwal यांच्या खंडपीठाने हा निकाल सुनावला आहे. त्यानुसार 5 पैकी 3 जणांची सुटका झाली आहे.
रिया चक्रवर्ती ही मागील महिन्याभरापासून भायखळा तुरूंगामध्ये आहे. आज तिची तुरूंगातून सुटका होणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एम्स रूग्णालयाने दिलेल्या अहवालात सुशांतची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचं सांगण्यात आले आहे. त्याच्या शरीरात कोणताही अंमली पदार्थ आढळला नसल्याचेही सांगण्यात आले आहे. सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय मुंबईमध्ये करत आहे. त्यांच्या सोबतीने ईडी आणि एनसीबी कडेदेखील काही तपास देण्यात आला आहे.