Kartik Aaryan ला चित्रपटांतून बाहेर काढल्याच्या बातम्यांवर मेकर्सने केला खुलासा, वाचा संपूर्ण सत्य

मात्र यावेळी मेकर्सने याबाबत मौन सोडले आहे आणि या मागील कारण सांगितले आहे.

Kartik Aaryan (Photo Credits: YouTube)

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) मागील काही दिवसांपासून त्याच्याविषयी समोर येणा-या निगेटिव्ह बातम्यांमुळेच जास्त चर्चेत आहे. पहिले करण जौहरच्या 'दोस्ताना 2' (Dostana 2) मधून बाहेर काढल्याच्या बातमीमुळे आणि त्यानंतर शाहरुख खानच्या 'फ्रेडी' या चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आल्याच्या चर्चेमुळे...त्यानंतर आता आनंद एल राय (Anand L Rai) यांच्या एका चित्रपटातून कार्तिकला बाहेर काढल्याची बातमी समोर येत आहे. मात्र यावेळी मेकर्सने याबाबत मौन सोडले आहे आणि या मागील कारण सांगितले आहे. एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले होते की, कार्तिकने वेळेवर या चित्रपटाबाबत होकार कळवला नव्हता. ज्यामुळे हा चित्रपट आयुष्मान खुरानाला ऑफर करण्यात आला.

मात्र या बातमीवर आनंद एल राय यांच्या प्रोडक्शन हाऊसने खुलासा केला आहे. कलर यलो प्रोडक्शनने ही बातमी खोटी असल्याचे सांगत म्हटले आहे की, 'या दोन गोष्टी एकत्र करण्यात आल्या आहेत. आम्ही कार्तिक आर्यनसोबत दुस-या एका चित्रपटाबाबत भेटलो होतो. तर आयुष्मान खुरानाला ऑफर झालेला चित्रपट दुसरा आहे. कार्तिकसोबत आमची संबंधित चित्रपटाला घेऊन बातचीत चालू आहे. त्यामुळे हा रिपोर्ट तंतोतंत खोटा आहे. आम्ही अनेक कलाकारांना भेटून चित्रपटांविषयी चर्चा करतो. मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही त्यांना त्या चित्रपटासाठी साइन करत आहोत.'हेदेखील वाचा- Kartik Aaryan आणि Karan Johar यांच्यातील वादात Kangana Ranaut ची उडी; पहा काय म्हणाली

सांगायचे झाले तर, आनंद एल राय आणि कार्तिक आर्यन पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करतील. मात्र आयुष्मान खुरानाने आनंद एल रायसोबत याआधीच शुभमंगल सावधान आणि शुभमंगल ज्यादा सावधान सारखे चित्रपट केले आहेत.

धर्मा प्रोडक्शन (Dharma Productions) प्रस्तुत 'दोस्ताना 2' (Dostana 2) या चित्रपटातून कार्तिक आर्यनची हकालपट्टी केल्याची बातमी वा-यासारखी सगळीकडे पसरली. करण जौहरने कार्तिक आर्यनला इन्स्टाग्रामवरुन (Instagram) अनफॉलो केले आहे. करणने कार्तिकला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्यानंतर या दोघांमध्ये नक्कीच मोठी फूट पडल्याचे उघड उघड दिसत आहे. मात्र कार्तिक अजूनही करण जौहरला फॉलो करत आहे. सूत्रांकडून अशी माहिती मिळाली होती, की कार्तिकला दोस्ताना 2 ची अर्धी स्क्रिप्ट आवडली नव्हती. तसेच तो चित्रपट निर्मात्यांना पुढील डेट्स देत नव्हता. म्हणून कार्तिकला डच्चू देत त्याच्या जागी दुस-या अभिनेत्याला घेण्यात येणार आहे.