'रात्रीस खेळ चाले 2' फेम पाटणकर यांचे 'नेलपॉलिश' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण, अभिनेता अर्जुन रामपाल सोबत दिसणार वकिलाच्या भूमिकेत
. 'नेलपॉलिश' (Nail Polish) असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटातून अधिश बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात तो बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याच्यासोबत झळकणार आहे.
रात्रीस खेळ चाले 2 (Ratris Khel Chale 2) या मालिकेत अण्णा आणि शेवंता प्रमाणे पाटणकर हे पात्र देखील प्रचंड लोकप्रिय झाले होते. ही भूमिका करणारा अभिनेता अधिश पायगुडे (Adhish Paigude) याची हिंदी सिनेमात वर्णी लागली आहे. 'नेलपॉलिश' (Nail Polish) असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटातून अधिश बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात तो बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याच्यासोबत झळकणार आहे. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या चाहत्यांना देखील या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात अधिश वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 1 जानेवारील हा चित्रपट 'Zee 5' या ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
कायदा आणि सुव्यवस्था यावर भाष्य करणारा नेलपॉलिश या चित्रपटात काम करणे हा आपल्यासाठी खूप वेगळा अनुभव असल्याचे अधिश याने एका मुलाखतीत सांगितले आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल सह मानव कौल, आनंद तिवारी, रजित कपूर देखील दिसणार आहेत.हेदेखील वाचा- The Battle Of Bhima Koregaon Poster: अभिनेता अर्जुन रामपाल याचा आगामी चित्रपट 'द बॅटल ऑफ भीमा कोरोगाव' चे पोस्टर प्रदर्शित
View this post on Instagram
कॉलेजमध्ये असल्यापासून ‘पुरुषोत्तम’, ‘फिरोदिया’ करंडक’ सारखे अनेक व्यासपीठ गाजवणारे अधिश यांनी आपली कलेची आवड जोपासण्यासाठी इंजिनियरची नोकरी सोडून कलेसाठी पूर्णवेळ देण्याचे ठरवले. त्यानंतर विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेआधी अधिशने ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘एक हजाराची नोट’, ‘तुंबाड’, ‘मेकअप’या मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
त्यामुळे पहिल्यांदाच हिंदीत झळकण्याची संधी आणि ते ही एका दिग्गज कलाकारासोबत हा अनुभव आपल्यासाठी पार वेगळा असल्याचे अधिशने सांगितले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2020 03:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

