Rasika Sunil Hot Bikini Photo: मराठी अभिनेत्री हिचा स्विमिंग पूल मधील बिकिनीतील हॉट फोटो पाहून चाहते झाले पाणी पाणी!
Rasika Sunil Bikini (Photo Credits: instagram)

झी मराठीवरील 'माझ्या नव-याची बायको' (Majya Navryachi Bayko) या मालिकेतून घराघरातून पोहोचलेली शनाया म्हणजे रसिका सुनील (Rasika Sunil) आजही लोकांच्या लक्षात आहे. काही कारणास्तव या मालिकेतून बाहेर पडल्यानंतरही तिची लोकप्रियता काही कमी नाही. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेल्या रसिकाचे असंख्य चाहते आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून तिचे अनेक चाहते तिला फॉलो करत असतात. त्यामुळे रसिकाही आपले ग्लॅमरस फोटो शेअर करुन आपल्या गाण्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच तिने बिकिनीमधील एक हॉट फोट सोशल मिडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये ती एका स्विमिंगपूल मध्ये उभी असून निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. यात तिच्या बोल्ड अदा अनेकांना घायाळ करत आहे. 'शनाया' फेम रसिका सुनील चा Sexy अंदाज सोशल मीडियात व्हायरल; फीटनेस फ्रीक्स देखील होतील थक्क (Photo)

पाहा फोटोज:

आपल्या ग्लॅमरस फोटोंसोबत रसिका आपले साडीतील देखील अनेक सुंदर फोटोज सोशल मिडियावर शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

रसिकाने 31 डिसेंबरच्या रात्री खास बिकनी अंदाजातील फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत रसिकाने लिहलेली पोस्ट देखील तितकीच खास आहे. मागील वर्षभरात रसिकाने तिच्या शरीरावर मेहनत घेतली आहे. फीटनेस ट्रेनर शैलेश परूळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने शरीरावर मेहनत घेतल्याचं तिने म्हटलं आहे. दरम्यान 2020 चं स्वागत करण्यासाठी आता मी अधिक आत्मविश्वासू, बेधडक झाली असल्याच्या भावना तिने आपल्या पोस्टमध्ये लिहल्या आहेत.