रणवीर सिंह ने भारतीय सांकेतिक भाषेला 23 वी अधिकृत भाषा बनविण्यासाठी शेअर केला हा खास व्हिडिओ

यासाठी रणवीरने रॅपर-कवी स्पिटफायर च्या 'वार्तालाप' चा एक सांकेतिक भाषेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या सांकेतिक चिन्हांचा वापर करण्यात आला आहे.

Ranveer Singh | (Instagram)

बॉलिवूडचा बाजीराव, सिम्बा रणवीर सिंह आपल्या अभिनयामुळे, लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळेस तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेत रणवीर सिंह (Ranveer Singh) याने भारतीय सांकेतिक भाषेला 23 वी अधिकृत भाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी एक विशेष मोहीम सुरु केली आहे. रणवीर यासंबंधीच्या याचिकेवर स्वाक्षरी करत आहे ज्याचा उद्देश या मोहिमेविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. या मोहिमेत अधिकाधिक भारतीयांनी सहभागी व्हावे यासाठी रणवीर एक विशेष व्हिडिओ शेअर केला आहे.

यासाठी रणवीरने रॅपर-कवी स्पिटफायर च्या 'वार्तालाप' (Vartalap) चा एक सांकेतिक भाषेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या सांकेतिक चिन्हांचा वापर करण्यात आला आहे. 2021 ची दिवाळी होणार 'सुरमयी'; भन्साळींच्या 'Baiju Bawra' साठी Ranveer Singh च्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

 

View this post on Instagram

 

This is our first sign language video on @ntnmshra’s track ‘#Vartalap’ with the hope that the track will trigger more conversations related to making Indian Sign Language the 23rd official language of India. Do give it a listen and we hope you like it. Link in Bio. @incinkrecords . Written & Performed by Spitfire: @ntnmshra Music Producers: @anushkadisco @manchandashikhar for @incinkrecords . Signer: @hardeeply for @acciomango Art: IncInk Art Studio @mihir.sud @avndsouza

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीर सिंह ने सांगितले आहे की, लवकरच तो नॅशनल असोसिएशन ऑफ डेफ (NAD) इंडिया द्वारे या अधिकृत याचिकेवर स्वाक्षरी करेल. यात एक्सेस मंत्र फाउंडेशन चे सुद्धा सामिल आहे. त्यांनी सांगितले की "या माध्यमातून आम्ही सांकेतिक भाषेला भारताची 23 वी अधिकृत भाषा बनविण्यासाठी समर्थन देत आहोत."

त्यामुळे अधिकाधिक भारतीयांना या मोहिमेस पाठिंबा द्यावा असे रणवीरने आवाहन केले आहे.

रणवीर सिंह दिग्दर्शक कबीर खान च्या '83' मध्ये लवकरतच दिसेल. हा क्रिकेट वर आधारित चित्रपट आहे. ज्यात भारताने 1983 क्रिकेच विश्व कपची कहानी सांगितली आहे. यात रणवीर कपिल देव यांची भीमिका साकारणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now