रणवीर सिंह चा रेड हुडी मधील अवतार बघून चिमुकली लागली रडायला (Watch Video)

अभिनेता रणवीर सिंह एका लाल रंगाच्या हुडी मध्ये दिसून आला होता, अगदी पायघोळ असणारा हुडी आणि त्याखाली काळ्या निळ्या रंगाचे शूज असा लूक घेऊन रणवीर आपल्या फॅन्स ना भेटला पण यावेळी एक चिमुकली रणवीरच्या अवताराला इतकी घाबरली की तिला अक्षरशः रडूच कोसळले.

Ranveer Singh (Photo Credits: Instagram)

अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याची अफाट एनर्जी आणि एका पेक्षा एक चित्रपटांमुळे काहीच वर्षात त्याने बॉलीवूड मध्ये आपली जागा तयार केली. यामुळेच आज त्याने असंख्य फॅन्स कमावले आहेत. पण आपल्या अभिनयासोबतच त्याचा हटके फॅशन सेन्स देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. कधी घागरा तर कधी रंगबेरंगी जॅकेट्स घालून रणवीर अवॉर्ड शो पासून ते फॅशन शो पर्यंत सर्वत्र त्याचा हटके लूक फॅन्सने पाहिला आहे. अलीकडेच रणवीर एका लाल रंगाच्या हुडी मध्ये दिसून आला होता, अगदी पायघोळ असणारा हुडी आणि त्याखाली काळ्या निळ्या रंगाचे शूज गॉगल व हातात स्पीकर्स घेऊन रणवीर आपल्या फॅन्स ना भेटला पण यावेळी एक चिमुकली रणवीरच्या अवताराला इतकी घाबरली की तिला अक्षरशः रडूच कोसळले. हा सर्व प्रकार एका व्हिडिओच्या (Viral Video) रूपात सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

इंस्टाग्राम वर व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडीओ मध्ये रणवीर सिंह हा नेहमीप्रमाणे कुल अंदाजात मीडियासमोर पोज देताना पाहायला मिळत आहे, यांनतर आपल्या गाडीकडे परतत असताना अनेक जण त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्याच्याभोवती गर्दी करतात. इतक्यात एक माणूस आपल्या हातात असणाऱ्या एका चिमुकली सोबत रणवीर कडे फोटो मागण्यासाठी येतो, पण रणवीर्ला पाहताच ही मुलगी घाबरून रडायला लागते.

पहा व्हायरल व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

Lil kiddo got scared of i Baba 🙄🤔

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

वास्तविक रणवीरने अशा प्रकारची स्टाईल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, याआधी सुद्धा त्याने अनेकदा आपण विचारही करू शकत नाही असे कपडे घालून फॅन्सना आश्चर्याचा धक्का दिला आहे. वास्तविक अशा प्रकारची धाडसी फॅशन करण्यासाठी रणवीरचे कौतुक होत असते पण अनेकदा मिम्सच्या रूपात नेटकरी त्याला जबरदस्त ट्रोल करतात.

दरम्यान, सध्या रणवीरचा आगामी चित्रपट '83 ' साठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे, यामध्ये त्याने क्रिकेटर व टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली आहे.