अभिनेत्री दीपिका पादुकोणचा जांभळ्या गाऊन मधील हॉट अवतार बघून पती रणवीर सिंह झाला घायाळ, दिली अशी हटके प्रतिक्रिया
ह्या फोटो दिपिका खूपच सेक्सी आणि हॉट दिसतेय. तिच्या या गाऊनमधील मादक अदा पाहून तिचे चाहते तर घायाळ झालेच आहेत, पण तिचा नवरोबा रणवीर सिंह ठार वेडा झालाय असं म्हणायला हरकत नाही.
बॉलिवूडचे सध्याचे हॉट आणि क्यूट जोडं 'दीप-वीर' म्हणजेच दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh). त्यांच्या त्यांच्या लव्हस्टोरीपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत सर्वच गोष्टी हा चाहत्यांसाठी चर्चेचा विषय बनला होता. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले आहेत की सोशल मिडियावर वारंवार ते आपल्या प्रेमाची कबुली द्यायला, कौतुक करायला इतकचं काय तर एकमेकांना कोपरखळी द्यायला सुद्धा मागे हटत नाही. नुकताचn
तिचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर पती रणवीरने दिलीय अशी क्यूट प्रतिक्रिया
रणवीर म्हणतोय दीपिका तुझे हे फोटो पाहून मी अक्षरश: घायाळ झालो आहे. त्याची ही प्रतिक्रिया पाहून तू घायाळ झालास तर कसं होईल अशी कोपरखळी त्या दोघांच्या चाहत्यांनी मारली आहे.
अलीकडेच रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण या दाम्पत्याने फेमिना ब्यूटी अवॉर्ड् 2019 (Femina beauty awards2019) या कार्यक्रमात हजेरी लावली. या वेळी तिला रणवीरबाबत विचारण्यात आले. दीपिकाला रणविरबाबत विचारताच तिने खुलेपणाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ज्या अगदी खासगी आहेत पण मजेशीर आहेत. जशा की, रणवीर खूप उशीरपर्यंत शॉवर घेतो. टॉयलेटमध्येही खूप उशीर थांबत असतो. दीपिकाने असेही सांगितले की, तो बेडरुममध्येही खूप वेळ लावतो. दीपिकाच्या या वाक्यावर उपस्थित ऑडियन्स हसायला लागला. त्यानंतर आपल्या वाक्याचा काही भलताच अर्थ मंडळींनी लावल्याचे तिच्या ध्यानात आले. मग तिने आपले वाक्य पुन्हा दुरुस्त करत सांगितले की, मला असं म्हणायचं होतं की, तो बेडवर झोपायला जायलाही खूप उशीर लावतो.
हेही वाचा- '83' चित्रपटाच्या सेटवर दीपिका ने रणवीरला दिला बॅट ने चोप, पाहा व्हिडियो
तसेच रणवीर सिंह च्या आगामी चित्रपट '83' मध्ये दीपिका पादुकोण कॅमियो रोल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या जीवनावर आधारित आहे.