Randeep Hooda's Transformation: स्वातंत्र्य वीर सावरकराच्या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाने केले स्वत:चे ट्रांसफॉर्मेशन; फोटो पाहून चाहते झाले थक्क, See Photo
रणदीपने हे पात्र साकारले नसून ते जगले आहे, हे ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. रणदीपने प्रत्येक दृश्यात सावरकरांची झलक उत्तम प्रकारे दाखवली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Randeep Hooda's Transformation: 'हायवे', 'सुलतान' आणि 'सरबजीत' यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत छाप पाडणारा अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पणामुळे चर्चेत आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात अभिनेत्याने अभिनय आणि दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटात तो स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे, ज्यामध्ये वीर सावरकरांच्या भूमिकेतील रणदीप हुड्डा लोकांना आवडला आहे.
या भूमिकेसाठी त्याने केलेले परिवर्तन पाहुन चाहत्यांना धक्का बसला आहे. रणदीपने हे पात्र साकारले नसून ते जगले आहे, हे ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. रणदीपने प्रत्येक दृश्यात सावरकरांची झलक उत्तम प्रकारे दाखवली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. (हेही वाचा - Mirzapur 3 Teaser Releasing Tomorrow: मोस्ट अवेटेड शो 'मिर्झापूर 3' चा टीझर उद्या होणार रिलीज, अली फजलने दिली हिंट)
दरम्यान, अलीकडेच रणदीप हुड्डाने त्याच्या सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा लूक लोकांना आश्चर्यचकित करत आहे. फोटोत तुम्ही रणदीप हुड्डाचं परिवर्तन पाहू शकता. वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुडाने वजन कमी केलेले स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोत रणदीपला ओळखणे कठीण होत आहे. त्याचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. (हेही वाचा -Sara Ali Khan Ramp Walk: सारा अली खानने केला रॅम्प वॉक; भाजलेले पोट पाहून चाहते झाले आश्चर्यचकित, चाहते म्हणाले, 'शेरनी आहे' (Watch Video))
अभिनेत्याने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'ब्लॅक वॉटर.' काला पानीच्या शिक्षेदरम्यान सावरकर अत्यंत बारीक झाले होते, हे रणदीपच्या या चित्रावरून दिसते. तशाच प्रकारे रणदीपनेही स्वत:चा कायापालट केला आहे. सध्या रणदीपचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते त्याच्या समर्पणाचे खूप कौतुक करत आहेत.
'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट आहे. ते क्रांतिकारक, समाजसुधारक आणि राजकारणी होते. ज्याचे पात्र रणदीप हुड्डा या चित्रपटात साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडेशिवाय अमित सियालसह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.