Dhoom 4: रणबीर कपूर आणि धूम 4? मग अभिषेक बच्चन आणि उदय चोपडा यांचे काय?

'वायआरएफ'ने आदित्य चोप्राच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक प्रेक्षकांसाठी नवीन कथानकासह लोकप्रिय धूम फ्रँचायझी अधिकृतपणे बदलली आहे.

Ranbir Kapoor | Photo Credit- instagram)

बॉलिवूड स्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 'धूम 4' (Dhoom 4) मध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला असल्याचे समजते. अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, उदय चोपडा, जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयाने गाजलेल्या या चित्रपटाचे आतापर्यंत तीन सिक्वेल आले आहेत. मात्र, आता भविष्यात येऊ घातलेल्या चौथ्या सिक्वेलमध्ये मात्र अभिषेक आणि उदय चोप्रा यांचे पुनरागमन होणार नसल्याचे समजते. त्यामुळे येणाऱ्या 'धूम 4' मध्ये चाहत्यांना त्यांची उणीव भासू शकते.

धूम 4 मध्ये नवी स्टारकास्ट

'धूम 4' बाबत पिंकव्हीलाने दिलेल्या वृत्तानुसार, धूम चित्रटात सुरुवातीपासून महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारा आदित्य चोपडा नव्या प्रेक्षकांसाठी काही महत्त्वाचे बदल करत आहे. त्यानुसार चित्रपटाच्या आगामी स्क्वेलमध्ये स्टारकास्ट बदलण्यावर जोरदार विचार झाला. परिणामी रणबीर कपूरने नवीन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे.

धमू आणि सिक्वेलमध्ये दिग्गजांचा अभिनय

अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रासोबत जॉन अब्राहमने खलनायक म्हणून 2004 मध्ये सुरुवात केलेला धूम, तंत्रज्ञान, अॅक्शन आणि उत्कंटावर्धक कथाकथनासाठी ओळखला जाऊ लागला. चित्रपटात दिग्दर्शकाने प्रत्येक भागामध्ये नवीन खलनायक आणले. 2006 च्या धूम 2 मध्ये हृतिक रोशन हा देखील त्यात सगभागी झाला. पुढे 2013 मध्ये आमिर खानने धूम 3 मध्ये भूमिका घेतली. आता, बहुप्रतिक्षित 'धूम 4' मध्ये रणबीरची चर्चा आहे. (हेही वाचा, Ramayan Movie: केजीएफ स्टार यशने 'रामायण' चित्रपटातील रावणाची भूमिका नाकारली; मिळणार होते 'इतके' मानधन)

प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आदित्य चोप्रा चौथ्या चित्रपटासाठी एक ताजेतवाने कथा तयार करण्यासाठी विजय कृष्ण आचार्य यांच्यासोबत काम करत आहे. ज्यांनी पूर्वी धूम 3 दिग्दर्शित केले होते. सूत्राने सांगितले की, 'धूम' ही आदित्य चोप्राला आवडणारी फ्रेंचायझी आहे आणि सध्याच्या काळाशी जुळवून घेण्यासाठी त्याने ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील चित्रपटांप्रमाणेच धूम 4 ची पटकथा आदित्य चोप्रा आणि विजय कृष्ण आचार्य यांनी तयार केली आहे. पूर्वी कधीही न अनुभवलेला जागतिक दर्जाचा चित्रपट अनुभव देणे हा त्यांचा दृष्टीकोन आहे.

रणबीर कपूरची मध्यवर्ती भूमिकेत

या चित्रपटात रणबीरला खलनायकाच्या भूमिकेत घेण्याबाबत प्रदीर्घ काळापासून विचार होत आहे. ज्यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. धूमचा वारसा पुढे नेण्यासाठी तो योग्य पर्याय आहे, असे आदित्य चोप्रा यालाही वाटत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

रणबीर कपूरचे आगामी चित्रपट

धूम 4 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत येण्यापूर्वी रणबीर कपूर नितेश तिवारीच्या 'रामायण' मध्ये दिसणार आहे. ज्याची सध्या बरीच चर्चा आहे. आपला 42 वा वाढदिवस साजरा करणारा हा अभिनेता बॉलीवूडमधील सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे आणि धूम 4 मधील त्याचा सहभाग या चित्रपटासाठी प्रचंड अपेक्षा निर्माण करेल अशी अपेक्षा आहे.